नंदुरबारमधील तेल भेसळप्रकरणी मंत्री झिरवाळांची मोठी कारवाई, दोन आयुक्तांना केले सस्पेन्ड

हे सरकार जनतेच्या पैशांची उधळपट्टी करायला सरकारला बसवले आहे का, हे सरकार काही लोकांसाठी चालवले जाते. आमदारांना वाय प्लस सिक्युरीटी कशासाठी दिली जाते? असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला. 

Narhari Zirwal – राज्यात होणाऱ्या भेसळयुक्त तेलावरुन सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार आक्रमक झाले. तसेच 2025-2026 पुरवण्या मागण्यावर बोलताना सदस्यांनी राज्यातील भेसळीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. सरकार काहीही खोटी सभागृहात माहिती देत आहे, तर या सरकावरच हक्कभंग आणावा, अशी आमची इच्छा आहे. आणि ही विनंती आम्ही अध्यक्षांना करणार आहोत. अशी टिका नाना पटोलेंनी केली.

दोन आयुक्तांवर कारवाई…

दरम्यान, या कंपनीच्या मालकाच्या विरोधात गुजरातमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या कंपनीला तत्काळ बंद केले जाईल. या कंपनीतील नमुन्यात भेसळ असल्याचे आढळले. मात्र यात अधिकाऱ्यांनी कारवाई करणे अपेक्षित होते, मात्र अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, त्यामुळं सभागृहातील सदस्यांची भावना लक्षात घेता, आणि लोकांचा जीवन-मरणाचा प्रश्न असल्यामुळं मी अन्न व औषध प्रशासन विभागातील सहायक आयुक्त आणि सहआयुक्त यांना सस्पेन्ड करण्याचे आदेश देतो, असं मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले.

झिरवाळांचे कारवाईचे आदेश…

मे. गोपाल प्रोव्हिजन, अक्कलकुवा या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात तेलाची भेसळ सुरु आहे. त्या कंपीनीच्या तक्रारीनंतर त्या कंपनीची चौकशी केली आहे. तीन-चार वेळा चौकशी केली आहे. यात मोठ्या प्रमाणात भेसळ आढळली आहे. नंदूरबारमधील अक्कलकुवा येथे मोठ्या प्रमाणात बाजारात भेसळयुक्त तेलाची विक्री होत आहे. अशा प्रश्न शिवसेना आमदार आमश्या पाडवी यांनी उपस्थित केला. याला उत्तर देताना सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे तो खरा आहे, असं अन्न व औषध प्रशासन मंत्री निरहरी झिरवाळ म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News