Uddhav Thackeray – महायुतीचे नवीन सरकार आल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा अजूनही निर्णय झालेला नाही आहे. यावर आज शिवसेना (ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विधानभवनात बैठक घेतली. तसेच उद्धव ठाकरे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदावरून आमदारांना सूचना दिल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचा सर्व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा सभागृहात लावून धरा, अशा प्रकारच्या सूचना दिल्याचे समजते.
समितीला मानतच नाही…
दुसरीकडे राज्य शासनाने नुकतेच त्रिभाषीय धोरण रद्द केले आहे. तसेच हिंदी सक्तीचा निर्णयही रद्द केला आहे. त्यामुळे आता नवीन जी समिती आहे, म्हणजे डॉ. नरेंद्र जाधव समितीची नियुक्ती केली आहे. परंतु त्रिभाषीय धोरण रद्द केल्यामुळे आपण डॉ. नरेंद्र जाधव समितीला मानतच नाही. किंवा त्या समितीला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटले म्हटले आहे. दुसरीकडे

अध्यक्षांना स्मरणपत्र द्या…
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पावसाळी हे दुसरे अधिवेशन होत असतानाही अजूनही विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय झाला नाही. यावर सभागृहात पक्षाच्या आमदारांनी हा मुद्दा लावून धरावा. आणि पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष यांना याची आठवण करुन द्यावी, याबाबत अध्यक्षांना स्मरणपत्र द्यावे. अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना दिल्या आहेत. महाविकास आघाडीतील सर्वाधिक आमदार हे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आहेत. एकूण वीस आमदार आहेत.