देशात पहिल्यांदाच खासगी फ्लायओव्हर बांधण्यास मंजुरी; कुठं होतोय उड्डाण पूल? जाणून घ्या

देशात फ्लायओव्हरचे बांधकाम सामान्यतः सरकारी निधीतून केले जाते. मात्र, पहिल्यांदाच एका रिअल इस्टेट डेव्हलपरला खासगी फ्लायओव्हर बांधण्याची परवानगी मिळाली आहे. हा प्रकार बेंगळुरूमध्ये घडला असून, प्रेस्टीज ग्रुप नावाची रिअल इस्टेट कंपनी 1.5 किमी लांब खासगी फ्लायओव्हर बांधणार आहे. हा फ्लायओव्हर बेलंदूर परिसरात उभारण्यात येत असलेल्या टेक पार्कला बेंगळुरूच्या आउटर रिंग रोड (ORR) शी थेट जोडेल. डेक्कन हेराल्डच्या अहवालानुसार, हा फ्लायओव्हर एका सार्वजनिक रस्त्याच्या आणि एका पावसाळी पाण्याच्या नाल्याच्या बाजूने जाईल.

BBMP कडून मंजुरी मिळाली

प्रेस्टीज ग्रुपला हा प्रोजेक्ट साकारण्यासाठी बृहत बेंगळुरू महानगर पालिकेने (BBMP) मंजुरी दिली आहे. या परवानगीसह प्रेस्टीज ग्रुप अशा काही निवडक कंपन्यांच्या यादीत सामील झाली आहे, ज्या सार्वजनिक जमिनीवर खासगी फ्लायओव्हर बांधून आपल्या प्रकल्पांपर्यंत सहज पोहोच सुनिश्चित करणार आहेत.

या फ्लायओव्हरच्या मंजुरीच्या बदल्यात, प्रेस्टीज ग्रुपने करियामन्ना अग्रहारा रोडचा विस्तार करण्याची आणि फ्लायओव्हरच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली आहे.

याआधीचे उदाहरणे

मान्यता एम्बेसी बिझनेस पार्कने ORR वर एलिवेटेड रोडपर्यंत थेट पोहोच देण्यासाठी फ्लायओव्हर बांधला होता.

लुलु मॉलने सार्वजनिक रस्त्याचा एक भाग हटवून अंडरपास बांधले.

बागमने ग्रुपने डोड्डानेकुंडी परिसरात 600 मीटरचा फ्लायओव्हर प्रस्तावित केला आहे.

BBMP ने मंजुरी देताना काही अटी ठेवल्या आहेत:

फ्लायओव्हर सर्वसामान्यांसाठी खुला असावा.

रोड वाइडनिंगसाठी दिलेल्या जमिनीच्या बदल्यात Transferable Development Rights (TDR) दिले जातील, बशर्ते सर्वकाही कायदेशीर चौकटीत असेल.

प्रेस्टीज ग्रुपने 40 फूट रुंद रस्ता स्वतःच्या खर्चाने तयार करावा, जो Sakra Hospital Road पर्यंतचा अंतर 2.5 किमीने कमी करेल.

2022 पासून प्रयत्न सुरू होते

प्रेस्टीज ग्रुपने पहिल्यांदा ऑगस्ट 2022 आणि नंतर नोव्हेंबर 2023 मध्ये BBMP कडे मंजुरीसाठी अर्ज केला होता. एप्रिल 2025 मध्ये डिप्टी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या संमतीनंतर ही परवानगी देण्यात आली.

BBMP चा हा निर्णय पब्लिक-प्रायव्हेट भागीदारी (PPP) तत्त्वावर शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

एक लक्षवेधी बाब म्हणजे, या फ्लायओव्हरच्या मंजुरीसाठी टेक पार्कच्या इमारतीच्या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर जवळपास एक वर्षाचा कालावधी लागला. हा टेक पार्क बेलंदूरमध्ये 70 एकर भूखंडावर उभारला जात आहे. बेंगळुरू डेव्हलपमेंट अथॉरिटी (BDA) ने सप्टेंबर 2023 मध्येच योजनेला मंजुरी दिली होती. सामान्यतः, मोठ्या टेक पार्क प्रकल्पांना मंजुरी तेव्हाच दिली जाते, जेव्हा डेव्हलपर प्रकल्पस्थळी पुरेशी पोहोच स्पष्टपणे दर्शवतात.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News