गुजरात टायटन्सला पराभवाची धूळ चाखत मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2025 च्या क्वालिफायर 2 सामन्यात पोहोचला आहे. उद्या संध्याकाळी ठिक 7.30 वाजता पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांत क्वालिफायर 2 सामना खेळला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाबला बंगळुरूकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता क्वालिफायर दोन सामना जिंकत नेमका कोणता संघ फायनलमध्ये जाणार असा सवाल क्रिकेट प्रेमींना पडला आहे.
MI VS PBKS कुणाचं पारडं जड?
दरम्यान मुंबईपेक्षा पंजाब किंग्सने 18 व्या मोसमात साखळी फेरीत दमदार कामगिरी केली. पंजाबने 14 पैकी 9 सामने जिंकले. तर पंजाबला 4 वेळा पराभूत व्हावं लागलं. तसेच पंजाबचा 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे पंजाबच्या खात्यात 19 पॉइंट्स होते. तर पंजाबचा नेट रनरेट हा साखळी फेरीनंतर +0.372 असा होता.

तर दुसऱ्या बाजूला मुंबईने पंजाबच्या तुलनेत 1 सामना कमी जिंकलाय. मात्र मुंबईचा नेट रनरेट इतर सर्व संघाच्या तुलनेत चांगला आहे. मुंबईने साखळी फेरीतील 14 पैकी 8 सामने जिंकले. तर पलटणला 6 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा 16 गुणांसह नेट रनरेट हा +1.142 असा होता.
मुंबई इंडियन्स पंजाबवर भारी पडणार?
आयपीएलच्या इतिहासात आजवर महत्वाच्या आणि प्ले ऑफ्सच्या सामन्यांत मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्यामुळे मुंबईच्या संघांकडे अधिक आत्मविश्वास आहे. शिवाय मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला मोठ्या फरकाने एलिमिनेटर सामन्यात लोळवलं आहे त्याच्या आत्मविश्वास संघाकडे आहे. गुजरातला मुंबईने मुल्लानपूरच्या मैदानात 20 धावांनी धुळ चारली होती.
दोन्ही संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, जॉनी बेयरस्टो, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, चरित असलंका, हार्दिक पांड्या (कॅप्टन), नमन धीर, मिचेल सैंटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट और जसप्रीत बुमराह
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन
प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्य, जोश इंगलिस, श्रेयस अय्यर (कॅप्टन), नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टोइनिस, अजमतुल्लाह उमरजई, हरप्रीत बराड़, काइल जैमीसन, विजयकुमार वैशाख/युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह