Vikhroli Bridge – विक्रोळीकरांसाठी एक आनंदाची व महत्वाची बातमी समोर येत आहे. विक्रोळीकरांची लवकरच वाहतूक कोडींतून सुटका होणार आहे. कारण पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आता वाहतूक दिवे (Signal) उभारणी कामे, वाहतुकीच्या अनुषंगाने मार्ग रेषा आखणी (Lane Marking), वाहतूक बेट (Traffic Iland), ही कामे सुरु आहेत.
पुढील २ दिवसात कोम पूर्ण होणार असून, वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात येत आहे.

रेल्वे व पालिकेकडून पुलाची उभारणी…
दरम्यान, रेल्वे विभागाकडून एकूण ७ तुळ्या स्थापित करण्यात आल्या असून त्यांचे एकूण वजन ६५५ टन आहे. या पुलावर महानगरपालिकेने टाकलेल्या तुळया सुमारे २१४२ टन इतक्या वजनाच्या आहेत. तसेच या तुळयांची लांबी २५ ते ३० मीटर इतकी आहे. पुलाच्या तीन टप्प्यांत एकूण १८ तुळया टाकण्यात आल्या आहेत. तसेच विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाची एकूण रुंदी १२ मीटर तर लांबी ६१५ मीटर इतकी आहे. त्यापैकी ५६५ मीटरची उभारणी पालिकेने केली आहे. उर्वरित ५० मीटर लांबीची उभारणी मध्ये रेल्वेकडून करण्यात आली आहे.
वेळेची बचत व वाहतूक कोंडीतून सुटका…
दुसरीकडे रेल्वे व पालिकेच्या समन्वयाने विक्रोळी पुलाची उभारणी झाली आहे, पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे पूर्व – पश्चिम बाजू जोडली जाणार आहे. या पुलाच्या एकूण १९ स्तंभांपैकी पूर्वकडील बाजूस १२ तर पश्चिमेकडील बाजूस ७ स्तंभ उभारले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूचे पोहोच रस्ते (Approach Roads), मार्गिकांवरील कॉंक्रिट, मास्टिक, ध्वनी रोधक, अपघातरोधक अडथळा (Anti Crash Barriers) आदी पूर्ण झालीत. दरम्यान, या पुलामुळं वेळेची बचत होणार असून, वाहतूक कोंडी कमी होणार आहे.