फ्रीज भिंतीपासून किती अंतरावर ठेवावे? वर्षानुवर्षे लोक हीच चूक करत आहेत, जाणून घ्या

बऱ्याच लोकांना घरात फ्रीज कुठे ठेवायचे याची योग्य कल्पना नसते. काही लोक तर फ्रीज थेट भिंतीला पूर्णपणे टेकवून ठेवतात, जे फ्रीजसाठी चांगले नसते.

Distance Between Fridge And Wall : थंडी असो की ऊन, घरामधील फ्रीज हे एक असे मशीन आहे जे २४ तास चालू असते. मात्र, जर घरातील इलेक्ट्रिकल उपकरणांची योग्य काळजी घेतली नाही, तर ती अल्पावधीतच खराब होऊ शकतात.

जर तुम्हाला तुमचे फ्रीज दीर्घकाळ कोणतीही मोठी अडचण न येता चालू ठेवायचे असेल, तर काही छोट्या-छोट्या गोष्टींचं पालन करणे गरजेचं असते. खरं तर, बऱ्याच लोकांना घरात फ्रीज कुठे ठेवायचे याची योग्य कल्पना नसते. काही लोक तर फ्रीज थेट भिंतीला पूर्णपणे टेकवून ठेवतात, जे फ्रीजसाठी चांगले नसते.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की फ्रीज आणि भिंतीच्या दरम्यान किती अंतर असणे आवश्यक आहे.

 योग्य अंतर का महत्त्व का आहे?

फ्रीज हे एक इलेक्ट्रिकल उपकरण आहे, जे चालू असताना गरम होते आणि ही उष्णता बाहेर फेकते. जर तुम्ही चालू असलेल्या फ्रीजच्या बाह्य भागाला हात लावाल, तर ते गरम वाटेल. ही उष्णता बाहेर जाण्यासाठी फ्रीजला काही मोकळी जागा लागते. मात्र, जेव्हा फ्रीज भिंतीला अगदी जवळ ठेवला जातो, तेव्हा ही उष्णता योग्यरित्या बाहेर जाऊ शकत नाही आणि त्यामुळे त्याच्या कंप्रेसरवर जास्त लोड येऊ लागतो.

कंप्रेसरवर जास्त लोड आल्यास त्याचे आयुष्य कमी होते आणि तो लवकरच खराब होण्याची शक्यता वाढते. पण घाबरण्याचे काही कारण नाही. जर तुम्हालाही माहित नसेल की फ्रीज आणि भिंतीच्या दरम्यान किती अंतर असायला हवं, तर याचबद्दलची माहिती पुढे दिली आहे.

कंपन्यांच्या मते योग्य अंतर किती?

या विषयाबद्दल इंटरनेटवर अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे, पण अधिकृत माहिती आपल्याला LG या कंपनीच्या वेबसाइटवर मिळाली आहे. LG च्या मते, फ्रीज आणि भिंतीच्या दरम्यान किमान ४ इंच म्हणजेच सुमारे १० सेंटीमीटरचे अंतर ठेवणे आवश्यक आहे.

त्यांच्या वेबसाइटवर हेही नमूद केले आहे की, जर फ्रीज भिंतीपासून योग्य अंतरावर ठेवला गेला नाही, तर कूलिंग मोटरमधून बाहेर येणारी उष्णता व्यवस्थित बाहेर जाऊ शकणार नाही. यामुळे फ्रीजची थंडावण्याची क्षमता कमी होईल आणि वीज बील वाढेल.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News