Bank Saving Account Balance : आजच्या धावपळीच्या युगात ऑनलाईन ट्रांजेक्शन मोठ्या प्रमाणात होत आहे. आर्थिक नियोजनासाठी बँकेत बचत खाते प्रत्येकाचेच असते. परंतु या बचत खात्यात प्रत्येकाचीच सेविंग्स (बचत) असते असे नाही. त्यामुळे बचत खात्यात मिनिमम विशिष्ट रक्कम बॅलन्स असल्याचं बँकांकडून सांगण्यात येत. जर तेवढा अपेक्षित बॅलन्स नसेल तर तुम्हाला बँकेकडून चार्ज लावण्यात येत होता. मात्र आता सरकारी एका बँकेने हा चार्ज न लावण्याच महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
कोणत्या बँकेचा निर्णय?
दरम्यान, देशात अनेक महत्त्वाच्या सरकारी बँका आहेत. त्यातील एक महत्वाची बँक म्हणजे कॅनरा बँक. या बँकेचे देशभर ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आता सेविंग्ज अकाउंटमध्ये मिनिमम जरी बॅलन्स नसला तरी चार्ज लागणार नाही. बँकेकडून चार्ज लावण्यात येणार नाही, अशी घोषणा बँकेने केली आहे. बँकेच्या या घोषणामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या खात्यात बचत खाते, वेतन खाते, एनआरआई बचत खाते आदि खाती सामील करण्यात आली आहेत.
