भारताचा सलामीवीर केएल राहुलने इंग्लंडमध्ये शानदार शतक ठोकले आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांना त्याने पूर्णपणे निष्प्रभ ठरवले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स असो किंवा फिरकीपटू शोएब बशीर, कोणीही राहुलला शतकापासून रोखू शकले नाही. राहुलच्या कसोटी कारकिर्दीतील हे नववे शतक ठरले. विशेष म्हणजे, इंग्लंडमध्ये राहुलचे हे तिसरे कसोटी शतक आहे.
केएल राहुलचे दमदार शतक
इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात राहुलने अतिशय संयमित आणि जबाबदारीची खेळी केली. त्यांनी 202 चेंडूत आपले शतक पूर्ण केले असून यामध्ये 13 चौकारांचा समावेश होता. पहिल्या डावात राहुलचे अर्धशतक थोडक्यात हुकले होते, पण दुसऱ्या डावात त्याने शतक ठोकून भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले आहे. यशस्वी जायस्वाल, साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल हे लवकर बाद झाल्यानंतर राहुलवर मोठी जबाबदारी होती, जी त्याने यशस्वीपणे पार पाडली.

सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडला
केएल राहुलने लीड्स कसोटीत केलेल्या या शतकाने भारतीय क्रिकेटच्या दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडला आहे. इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी शतक करणाऱ्या भारतीय सलामीवीरांच्या यादीत ‘लिटल मास्टर’ गावस्कर अव्वल होते. मात्र, आता केएल राहुलने तिसरे शतक झळकावून त्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.
राहुल-पंत यांची शानदार खेळी
भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करत आहे. केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाचा धावसंख्या 300 धावांच्या पुढे गेली आहे. ऋषभ पंतनेही शतक पूर्ण केले आहे.