करुण नायरचं दमदार द्विशतक, विराट कोहलीची रिप्लेसमेंट सापडली

भारतीय अ संघाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी अभिमन्यू ईश्वरनला कर्णधार करण्यात आले आहे. भारताचे सुरुवातीचे २ गडी लवकर बाद झाले, पण करुण नायर आणि सरफराज खान यांनी डाव सावरला.

Karun Nair Double Hundred Against England :  करुण नायरने इंग्लंड दौऱ्यावर द्विशतक ठोकले आहे. त्याने २७२ चेंडूंचा सामना केला. करुण नायर अजूनही इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर ठामपणे उभा आहे. भारत अ आणि इंग्लंड लॉयन्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात करुण नायरच्या बॅटमधून हे द्विशतक आले.

करुण नायरचे द्विशतक

करुण नायर इंग्लंड दौऱ्यावर शानदार फलंदाजी करत आहे. भारत अ संघाचा इंग्लंड लॉयन्ससोबतचा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना शुक्रवरी (३० मे) सुरू झाला. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने आज दुसऱ्या दिवशी हे वृत्त लिहिपर्यंत १०४ षटकांत ५ गडी गमावून ४७५ धावा केल्या आहेत.

भारतीय अ संघाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी अभिमन्यू ईश्वरनला कर्णधार करण्यात आले आहे. भारताचे सुरुवातीचे २ गडी लवकर बाद झाले, पण करुण नायर आणि सरफराज खान यांनी डाव सावरला. सरफराजने ११९ चेंडूंमध्ये ९२ धावांची खेळी केली. तर ध्रुव जुरेलने १२० चेंडूंमध्ये ९४ धावा केल्या. सध्या करुण नायरसोबत शार्दूल ठाकूर मैदानात टिकून खेळत आहे.

करुण नायरची टीम इंडियात पुनरागमन

भारताची सीनियर टीम देखील पुढील महिना जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत ५ कसोटी मालिका सामन्यांची खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणाही करण्यात आली आहे. करुण नायरलाही भारताच्या सीनियर संघात स्थान देण्यात आले आहे. करुण जवळपास ८ वर्षांनंतर भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News