Mumbai – रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीबाबत जीआर मागे घेतल्याची घोषणा केली आहे. या घोषणानंतर राज्यात आनंद व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे दोन मराठी माणसं एकत्र येतात म्हणून आणि विशाल मोर्चा निघणार म्हणून…. मराठी माणसाच्या दबावामुळे राज्य सरकार बॅकफूटवर गेले. आणि अध्यादेश रद्द केला आहे. त्यामुळे हा मराठी माणसाचा विजय असल्याचं दोन्ही ठाकरे बंधूंनी म्हटले आहे.
परंतु जर त्यांचा मोर्चा निघणार म्हणून जर सरकारने अध्यादेश मागे घेतला असला तर, हिम्मत असेल तर दोन ठाकरे बंधूंनी शेतकरी कर्जमाफीसाठी मोर्चा काढावा, असं माजी मंत्री आणि भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज-उद्धव यांना आव्हान दिलं आहे.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून…
दुसरीकडे जेव्हा मराठी बरोबर दुसरी भाषा म्हणून इंग्रजी सक्तीची केली, तेव्हा बाकीचे कुठे गेले होते. तेव्हा त्यांना इंग्रजीलाही विरोध केला पाहिजे होता. पण तसे झाले नाही आणि आता केवळ आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत, म्हणून हा मोर्चा आणि आवाज उठवला जातोय… याचे राजकारण केले जाते, असा गंभीर आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे बंधूंवर केला. जर आपण हिंदीला विरोध करतोय तर मग इंग्रजीलाही विरोध झाला पाहिजे. पण इंग्रजी आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळात स्वीकारली आहे. असेही मुनगंटीवार म्हणाले.
मला फरक पडत नाही…
मी सत्यासाठी लढत राहणार, सत्य बोलण्यासाठी मी कशाची पर्वा करत नाही किंवा परिणामांचाही चिंता करत नाही. आणि इथून पुढेही सत्यासाठी सभागृहात आवाज वाढवणार आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. शक्तीपीठ महामार्गासाठी 20,000 कोटीचे राज्य सरकारने या प्रकल्पासाठी कर्ज काढले आहे. याबाबत राज्याचे वित्त विभागाने चिंता व्यक्त केली आहे. यावर बोलताना मनगटीवर म्हणाले की, मी याबाबत आकडेवारीचा अभ्यास करेन आणि त्यानंतरच वक्तव्य करेन, असे मुनगंटीवार म्हणाले.