मुंबई – काँटा लगा गर्ल शेफाली जरीवाला हिच्या मृत्यूचं गूढ दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतंय. तरुणपणाच्या हव्यासापोटी तिचा जीव गेल्याचं सांगण्यात येत असतानाच नवी माहिती समोर आलीय. फ्रिजमधलं अन्न खाल्यामुळे आता तिचा जीव गेल्याचा दावा करण्यात येतोय.
यामुळं तिच्या चाहत्यांसह सर्वांनाच धक्का बसला. कारण वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी शेफालीनं हे जग सोडलं. राहत्या घरी तिला हार्ट अटॅक आला, आणि रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ही आतापर्यंतची समोर आलेली माहिती. पण पोलिसांकडून या मृत्यू प्रकरणाचा आता कसून तपास केला जातोय

शेफालीच्या मृत्यूचं गूढ कायम
पोलिसांनी आतापर्यंत 16 जणांचे जबाब नोंदवले आहेत. शेफालीचा पती आणि घरातील स्वयंपाकींचेही जबाब नोंदवले. घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. शेफालीच्या मृत्यूच्या कारणाचा तपास सुरु आहे
पोलिसांना पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा आहे
शेफाली जरीवाला हिच्या मृत्यूच्या कारणांचा तपास करत असतानाच पोलिसांना तिचं निधन ज्या दिवशी झालं, त्या दिवसाच्या तिच्या दिनक्रमाविषयी माहिती मिळालीय, शिवाय ती घेत असलेल्या ट्रिटमेंटशी संबंधित काही गोष्टीही तपासातून समोर आल्यात.
फ्रिजमधील खालेल्या शिळ्या अन्नानं गेला जीव
शेफालीचा मृत्यू झाला, त्याच्या आधी तिच्या घरी पूजा होती. पूजेनिमित्त तिनं उपवास ठेवला होता. उपवासाच्या रात्री तिनं फ्रिजमधलं शिळं अन्न खाल्लं, त्यानंतर रक्तदाब कमी झाल्यानं ती बेशुद्ध पडली. मृत्यूच्या अगोदर तिच्या छातीत वेदना होऊ लागल्या होत्या. तिच्या घरात व्हिटॅमिन सी आणि ग्लुथाथिओन ही औषधं सापडली. शेफालीने नेहमीप्रमाणं अँटी-एजिंग इंजेक्शन घेतलं होतं. आता सगळं स्थिरस्थावर असताना, एकाएकी तिचं असं निघून जाणं, हेच एक गूढ बनलंय.