Mansoon Session : पावसाळी अधिवेशन आजपासून 18 जुलैपर्यंत चालणार आहे. तर आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी राज्यातील विविध प्रश्नावरुन विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. तर विधानसभेत केवळ 26 मिनिटाचे कामकाज चालले. त्यानंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. या कामकाजात चार अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. आणि शोक प्रस्ताव मांडण्यात आला. तर दुसरीकडे अर्थमंत्री अजित पवारांनी 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या.
कोणत्या विभागासाठी किती कोटीची निधी?
दरम्यान, या पुरवण्या मागण्या राज्यातील विविध पायाभूत प्रकल्प म्हणजे रस्ते, मेट्रो, सिंचन योजना, महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन, मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, दुर्बल व वंचित घटकांच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे. यामध्ये यामध्ये नगर विकास विभागासाठी सर्वाधिक निधी म्हणजे 15465,13 कोटी देण्यात आला आहे. तर सर्वाजनिक बांधकाम विभागासाठी 9068,49 कोटी देण्यात आले आहेत. तर ग्रामविकास विभागासाठी 4733,11 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

निव्वळ भार 40 हजार 644 कोटी 69 लाख रुपयांचा…
एकूण पुरवण्या मागण्यांपैकी 19 हजार 183 कोटी 85 लाख रुपये अनिवार्य आहे. तर 3 हजार 664 कोटी 52 लाख रुपये केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. आणि 34 हजार 661 कोटी 34 लाख रुपये विविध कार्यक्रमांतर्गत खर्च होणार आहे. दरम्यान, एकूण पुरवणी मागण्या 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या असल्या तरी याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा 40 हजार 644 कोटी 69 लाख रुपयांचा असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.