अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हवाई हल्ले केले आहेत, ज्यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथे हा हल्ला करण्यात आला असून तो पूर्णपणे यशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य पूर्वेतील संघर्षात आता अमेरिका थेटपणे सहभागी झाली आहे. इराणच्या अणुतळांवरील हल्ल्याची माहिती खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे, त्यामुळे अमेरिकेने आता या युध्दात हस्तक्षेप केला आहे.
अमेरिकेचा हस्तक्षेप; संघर्ष वाढणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ही माहिती देत या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सर्व अमेरिकन विमाने आता इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडली आहेत आणि सुरक्षितपणे घरी परतत आहेत. बहुतेक बॉम्ब फोर्डो नावाच्या जागेवर टाकण्यात आले होते.” त्यांनी अमेरिकन सैन्याचे कौतुक ही केले आणि म्हणाले, “आमच्या महान योद्ध्यांचे अभिनंदन! जगातील इतर कोणतेही सैन्य हे करू शकत नाही.” यासोबतच त्यांनी म्हटले आहे की, आता शांततेचा काळ आहे. किंबहुना, या हल्ल्यावर इराणकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या दोन देशातील तणावात आता अमेरिकेनेही उडी घेतल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वाढली आहे.

US President Donald Trump posts, “We have completed our very successful attack on the three Nuclear sites in Iran, including Fordow, Natanz, and Esfahan. All planes are now outside of Iran air space. A full payload of BOMBS was dropped on the primary site, Fordow. All planes are… pic.twitter.com/pNKQMt95U6
— ANI (@ANI) June 21, 2025
अमेरिकेची इस्रायलला मदत
जेव्हा अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला तेव्हा त्यांनी स्वतःला थेट इराणशी युद्धात ओढले. हे पाऊल इराणचा अणुकार्यक्रम संपवू इच्छिणाऱ्या इस्रायलला मदत करणारे म्हणून पाहिले जाते. मात्र हा निर्णय विशेष आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात असे वचन दिले होते की ते पुन्हा अमेरिकेला मध्य पूर्वेतील युद्धात ओढणार नाहीत. त्यामुळे आता मध्य पूर्वेत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.