Sindoor Operation : भारत हल्ला सहन करणार नाही हे दाखवून दिले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया

हा नवीन भारत आहे. शांत बसणारा भारत नाही, जर तुम्ही आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर आम्ही देखील जशाच तसे उत्तर देऊ हे भारताने दाखवून दिले आहे. या मोहिमेबद्दल मी केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी आणि तिन्ही लष्करी दलाचे अभिनंदन करतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra fadnavis – मंगळवारी रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. यावेळी भरताने हवाई हल्ला करत पाकव्याप्त कश्मीरमधील ९ अतिरेक्यांची तळं नष्ट केली. तर 26 अतिरेक्यांच्या खात्मा केला. या हल्ल्यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत असताना आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भारत हल्ला सहन करणार नाही हे दाखवून दिले. ऑपरेशन सिंदुर हे नावच पुरेसे बोलके आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या हल्ल्याबात भारतीय सैन्य दलाचे आणि पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन केले.

ऑपरेशन सिंदुर हे नावच बोलके…

दरम्यान, हे भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, भारत हल्ला सहन करणार नाही. ऑपरेशन सिंदुर हे नावच पुरेसे बोलके आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मंत्रालयात १०० दिवसांचा कृती आराखडा याचा निकाल जाहीर झाल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिन्ही लष्करी दल, केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींचे या यशस्वी मोहिमेबद्दल सिंदूर ऑपरेशनबद्दल अभिनंदन केले. पाकिस्तान येथील दहशतवाद्यांचे 9 अड्डे अचूकपणे एयर स्ट्राइक करून पूर्णतः उद्ध्वस्त केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व देशवासीयांचे मन:पूर्वक अभिनंदन, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पुरावा मागण्याकरिता जागा नाही…

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मला असं वाटतं की आपल्यावर झालेल्या हल्लाचा भारताने योग्य पद्धतीने बदला घेतला आहे. विशेषता ऑपरेशन सिंदूर हे नाव अतिशय बोलकं वाटते. आपण सगळे मिळून भारतीय प्रधानमंत्री मोदी आणि लष्कराचे अभिनंदन करुया, असं मुख्यमंत्री म्हणाले. हे सिंदूर ऑपरेशनचा केंद्र सरकार आणि लष्कराने तयारी केली होती. नियोजन केले होते. हेअर स्ट्रीक करून लष्कराने दहशतवाद्यांचे ९ आड्डे नेस्तानाबूत केले. आणि या हल्ल्याचे शूटिंग केले आहे. त्यामुळं कोणाला पुरावा मागण्याकरता जागा राहिलेली नाही. असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.


About Author

Astha Sutar

Other Latest News