जून महिन्याच्या सुरूवातीपासून सोने- चांदीच्या दरात चांगलीच हालचाल पाहायला मिळत आहे. आज सोने अथवा चांदीचे दागिने खरेदीचा विचार करत आहात का? आज शनिवार, 14 जून, 2025 रोजी सोन्याचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. तर चांदीच्या दरात काहीसा बदल झाला आहे. सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 280/- रूपयांनी वाढले आहेत. तर चांदीच्या दरातही किलोमागे 100 रूपयांची वृध्दी पाहायला मिळत आहे. देशातील बहुतांश भागात आज सोने प्रतितोळा (10 ग्रॅम) 1 लाखाच्या आसपास तर चांदी किलोमागे 1 लाख रूपयांच्या पार असल्याचं चित्र आहे.
इस्रायल-इराण युध्द तरी दर वाढ कायम
शुक्रवारी भल्या पहाटेच इस्त्रायलने इराणवर हवाई हल्ले केल्याचे सांगितले. तर दुसरीकडे तेहराणमधून सुद्धा धमाके झाल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणमधील न्युक्लिअर इन्फ्रास्ट्रक्चर आणि बॅलेस्टिक मिसाईल ठिकाण्यांना इस्त्रायने लक्ष्य केले. या नवीन घडामोडींमुळे जग पुन्हा धास्तावले आहे. मध्य-पूर्व देशात तणाव वाढला आहे. तर दुसरीकडे क्रूड ऑईलच्या पुरवठ्यावर पण प्रश्नचिन्ह उभं ठाकले आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज या महत्त्वाच्या रस्त्याविषयी चिंता वाढली आहे. तिथूनच कच्चे इंधनाचा पुरवठा केला जातो. या तणावामुळे सोन्याला ग्लोबल मार्केटमध्ये मागणी वाढली आणि सोन्याच्या किंमती वाढल्या. जागतिक बाजारात सोने 3400 डॉलर प्रति ट्रॉय औसच्या पुढे पोहचले आहे. भारतात ही वायदे बाजारात सोन्याने 1 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

सोन्यातील तेजी कायम राहण्याची चिन्हं
पृथ्वी फिनमार्ट कमोडिटी रिसर्चचे प्रमुख मनोज कुमार जैन यांच्या मते सोने सध्या 6 आठवड्यांच्या विक्रमी उंचीवर आहे. जर जागतिक बाजारात सोने 3,400 डॉलरपेक्षा अधिक उसळले तर यामध्ये अजून तेजी येऊ शकते. आजच्या सत्रात सोने आणि चांदीत चढउतार दिसून आला. पण सोने 3,330 डॉलर तर चांदी 35 डॉलरसह टिकू शकते. तर ऑगमॉन्ट रिसर्च की हेड, रेनिशा चैनानी यांनी सध्याच्या घडामोडी कायम राहिल्या तर सोने लवकरच 1,05,000 रुपयांपर्यंत झेप घेईल असे म्हटले आहे.
सराफा बाजारातून आज सोने चांदीच्या दरांबाबत जी अपडेट समोर आलीयं, त्यानूसार (Gold Silver Price Today) 14 जून, 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Rate Today) 93,350/- तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,01,830/- रूपये 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 76,380/- रुपये इतकी आहे. तर 1 किलो चांदीची किंमत देशातील बहुंताश प्रमुख शहरात 1, 10, 100/- रुपयांच्या आसपास आहे.