भारतीय रेल्वेचे Railone ॲप लाँच ; रेल्वे प्रवासाची सगळी माहिती मिळणार!

भारतीय रेल्वेने ‘RailOne’ नावाचे एक नवीन ‘ऑल-इन-वन’ मोबाइल ॲप्लिकेशन लाँच केले आहे.

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी RAILONE नावाचे नवीन ॲप लाँच केले आहे. या ॲपद्वारे आता प्रवाशांना रेल्वे प्रवासाशी संबंधित सर्व माहिती एका ठिकाणी मिळणार आहे. तिकीटांची स्थिती, थेट पद्धतीने आरक्षण, ट्रेनचे लाईव्ह लोकेशन, प्लॅटफॉर्म नंबर, डिले स्टेटस, केटरिंग सेवा, स्टेशनवरील सुविधा अशा अनेक बाबींचा तपशील या ॲपमध्ये पाहता येणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी ॲपची निर्मिती

रेल्वेने प्रवाशांना अधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने रेल्वेशी संबंधित सर्व प्रश्न आणि गरजांसाठी एकच अॅप असावे यासाठी ‘रेलवन’ नावाचे एक नवीन ‘सुपरअॅप’ लाँच केले आहे. नवीन RailOne अॅप सर्व प्रवासी सेवा एकाच अॅपमध्ये प्रदान करेल. आरक्षित, अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकिटे बुक करणे, पीएनआर आणि ट्रेनची स्थिती तपासणे, कोचची स्थिती जाणून घेणे, रेल्वे मदत आणि प्रवास अभिप्राय ट्रॅक करणे ही सर्व कामे आता एकाच अॅपवरून करता येणार आहे.

अनेक सुविधा एकाच ॲपमध्ये मिळणार

‘RailOne’ हे ॲप तिकीट बुकिंग, ट्रेनचे थेट स्थान (रिअल-टाईम ट्रॅकिंग), जेवण ऑर्डर करणे, पीएनआर स्थिती, परतावा (रिफंड) आणि इतर सर्व रेल्वे सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी डिझाइन केले आहे. यामुळे प्रवाशांना आता IRCTC Rail Connect, UTSonMobile, Rail Madad, NTES आणि Food on Track यांसारख्या अनेक ॲप्सची गरज भासणार नाही. या सर्वांची कार्यक्षमता ‘RailOne’ मध्ये एकत्रित करण्यात आली आहे. हे ॲप वापरण्यास सुलभ असून अँड्रॉइड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. रेल्वेच्या डिजिटल सेवांमध्ये हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात असून प्रवाशांचा वेळ, त्रास आणि संभ्रम वाचण्यास मदत होणार आहे.

 


About Author

Rohit Shinde

Other Latest News