Ravindra Chavan – मंगळवारी दिगज यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती यानंतर आज भाजप प्रदेश कार्यालयात त्याने प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला यावेळी भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते दरम्यान यावेळी अनेक पक्षातील नेते कार्यकर्ते पदाधिकारी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रवीण माने आणि अपूर्व हिरे यांनी भाजपात प्रवेश केला.
मंगळवारी महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची अधिकृत निवड करण्यात आली. १२ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

पक्षाची आणखीन ताकद वाढली…
दरम्यान, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे मोदी हे दिवस-रात्र काम करून देशाला विकासाच्या चालण्यात येत आहेत आणि 2047 पर्यंत देशाला महाशक्तिशाली बनवण्याचा संकल्प मोदी ने केला आहे त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे असा आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं. तसेच ज्या कार्यकर्त्यांनी आज भाजपा प्रवेश केला आहे त्यामुळे आणखी आमची ताकद वाढली असून कोणत्याही कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना निराश करणार नाही सर्वांना योग्य ते न्याय देणार असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
देश व राज्य विकासाच्या दिशेनं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार अतिशय विकासाला चालना देत आहेत तर राज्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याची विकासाची सुरू आहे अतिशय विकासाची गती गतिमान विकास होत आहे राज्यात अनेक पायाभूत प्रकल्प माहितीने सरकारने आणलेले आहेत यात महत्त्वाचे आणि समाजोपयोगी प्रकल्प आहेत आजच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे त्यांचे स्वागत आहे आपण संघटनात्मक बांधणीसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी काम करणार आहे, असं चव्हाण म्हणाले.
हे फक्त भाजपामध्येच होऊ शकते
भाजप पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांनी मोठा पदापर्यंत पोहोचू शकतो हे फक्त भाजपा पक्षातच होतं. कारण एक सामान्य कार्यकर्ता असलेला मी आज प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे नक्कीच हे केवळ भाजपासारख्या पक्षातच होतं. त्यामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, आपली ही साथ तुम्हाला असेलच, संघटना पक्ष संघटनासाठी प्रामाणिकपणे काम करा, असं नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले.