फक्त 5 लाख भरा आणि नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये हक्काचे घर मिळवा; म्हाडाची योजना नेमकी काय?

म्हाडाने नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागासाठी गृहनिर्माण लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 1351 घरे तर नाशिक विभागात 1485 घरांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

बड्या महानगरात आपले घर असावे असे प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. अशावेळी म्हाडाची लोकांना नक्कीच मदत होत असते. सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. म्हाडाने नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागासाठी गृहनिर्माण लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 1351 घरे तर नाशिक विभागात 1485 घरांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अल्प उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गटातील (MIG) लोकांसाठी फक्त 5 लाख रुपयांपासून घरे उपलब्ध केली जाणार आहेत.

नाशिक आणि संभाजीनगरमध्ये मिळवा हक्काचे घर

नाशिकमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) 12.68 लाख ते 13.55 लाख रुपये किमतीत घरे उपलब्ध असणार आहेत. ही घरे वडाळा शिवारमधील पार्श्वनाथ प्रोजेक्ट या ठिकाणी आहेत. तसेच अडगाव शिवारमधील प्रणव गार्डनमध्येही अल्प उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध असून त्यांची किंमत 11.94 लाख ते 15.31 लाख रुपये असणार आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) अहिल्यानगरमधील सिव्हिल हुडको, सावेदी येथे फक्त 5.48 लाख रुपयांना घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

पती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नक्षत्रवाडीमध्ये 1056 घरे असून त्यांची किंमत 15.30 लाख रुपये आहे. याशिवाय चिखलठाणामध्ये 158 घरे असून ती 27 लाख रुपयांना उपलब्ध आहेत. देवळाई येथे 14 घरे असून त्यांची किंमत 13.19 लाख ते 16.19 लाख रुपये आहे. आनंद पार्कमध्ये 18 घरे असून ती 4.85 लाख ते 6.27 लाख रुपयांना उपलब्ध आहेत, तर चिखलठाणा येथे आणखी 6 घरे 34 लाख रुपयांना आहेत.

घर मिळविण्यासाठी 11 ऑगस्टपूर्वी करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2025 असून 12 ऑगस्ट 2025 पर्यंत रकमेचा भरणा करता येईल. 18 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 25 ऑगस्ट 2025 रोजी अंतिम पात्र यादी जाहीर केली जाणार आहे. हे हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. म्हाडाच्या या घरांसाठी अर्ज प्रक्रिया 30 जून रोजी सुरू झाली असून त्यासाठीची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2025 आहे. इच्छुक अर्जदार म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळ https://housing.mhada.gov.in यावर अर्ज करू शकतात. अर्ज भरल्यानंतर रकमेचा भरणा करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2025 असेल.

त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या घराचे स्वप्न साकार करायचे असेल, तर त्वरा करा. ही तुमच्यासाठी एक मोठी संधी ठरू शकते.


About Author

Rohit Shinde

Other Latest News