हिमालच प्रदेशचे नैसर्गिक सौंदर्य स्वर्गापेक्षा कमी नाही, परंतु पर्यावरणीय बदलांमुळे हिमाचल आता नैसर्गिक आपत्तीमुळे चर्चेत आहे. हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद पडले आहेत. ढगफुटी आणि पुराने येथे देशभरातील पर्यटक अडकून पडले आहेत. महाराष्ट्रातीलही ६०० पर्यटक येथे अडकून पडले आहेत. गेल्या शतकात हिमाचल प्रदेशचे तापमान सरासरी 1.6 °C तक वाढले आहे. त्यानंतर येथील पर्यावरणात बदल झाला आहे. नैसर्गिक संकटाचे प्रमाण आणि तीव्रता वाढत चालली आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात निसर्गाने हाहाकार माजवला आहे. येथे ढगफुटीने आणि पुराने आपले ६०० हुन अधिक पर्यटक अडकले आहेत.या भागातील पर्वतातील विकास कामे या नैसर्गिक संकटांना आमंत्रण ठरत आहे.
ढगफूटी आणि भूस्खलनाच्या घटनांत वाढ
वाढत्या तापमानामुळे वातावरणात अधिक आद्रता तयार झाली आहे. त्यामुळे अचानक मोठी पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे अचानक येणारा पूर आणि भूस्खलन वाढले आहे. शिवाय हिमाचलचा सुमारे ४५ टक्के क्षेत्र भूस्खलनस, पुर आणि हिमस्खलनाची उच्च जोखीमेखाली आहे. त्यामुळे जर जलद उपाय योजले नाहीत तर साल २१०० मध्ये सरासरी तापमानात अतिरिक्त 3-5 °C वाढ होऊ शकते. त्यामुळे नैसर्गिक संकटाचे तीव्रता आणखीन वाढण्याची शक्यता पर्यावरण तज्ज्ञांनी वर्तविली आहे. डोंगर कापल्याने रस्ते बांधल्याने पर्वतातील स्थिरता भंग झाली आहे. त्यातच जोरदार पर्जन्यवृष्टीने येथील दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व वाढत्या घटनांमुळे हिमाचल प्रदेशचे नागरिक मात्र चांगलेच भयभीत झाले आहेत.
