देशात 1 जुलैपासून बदलणार पाच नियम, प्रत्येक बदलाचा खिशावर होणार परिणाम

या बदलांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर आणि तुमच्या खिशावर होणार आहे. या बदलांमुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यात आर्थिक बोजा कसा वाढू शकतो.

Rules change from 1 July : सामान्य लोकांबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. उद्यापासून १  तारीख अर्थात जुलै महिना सुरु होणार आहे. १ जुलैपासून तुमच्या आयुष्यात अनेक मोठे व पाच बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर आणि तुमच्या खिशावर होणार आहे. या बदलांमुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यात आर्थिक बोजा कसा वाढू शकतो. आणि खिशावर कसा परिणाम होणार पाहूया…

आधार-पॅनशी लिंक अनिवार्य

दरम्यान, आधार-पॅन कार्ड हे दोन्ही महत्वाचे कागदपत्र आहेत. पण अद्यापपर्यंत तुमचे आधार-पॅन कार्ड लिंक असणे अनिवार्य केले आहे. आधार पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.

एलपीजी सिलेंडरचे नवीन दर

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसचे नवीन दर जाहीर केले जातात. उद्या १ जुलै रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दरही जाहीर केले जातील. १ जून रोजी उद्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आणि घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे.

एटीएम वापरणे महाग होणार

पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर होतो. मात्र उद्यापासून एटीएम वापरणे आता अधिक महाग होणार आहे. जर आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांनी दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून महिन्यातून ३ पेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारावर शुल्क आकारले जाणार आहे. म्हणजे प्रत्येक व्यवहारास २३ रुपये तर खात्यातील बॅलन्स चेकसाठी ८.५० रुपये मोजावे लागणार

डीमॅट खात्यासाठी केवायसी करा

तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर आता तुमचे ट्रेडिंग खाते केवायसी ३० जूनपर्यंत पूर्ण करा, अन्यथा तुमचे खाते तात्पुरते बंद केले जाऊ शकते. असे झाल्यास तुम्ही शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकणार नाही. त्यामुळं डीमॅट खाते केवायसी करणे अनिवार्य आहे.

रेल्वे भाडेवाढ होणार…

कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच भाडेवाढ केली जात आहे. भारतीय रेल्वे प्रवासी भाडे वाढवणार आहे.  नॉन-एसी (स्लीपर/जनरल क्लास): १ पैसा/किमी, एसी कोचः २ पैसे/किमी, ५०० किमी पर्यंतच्या दुसऱ्या श्रेणीच्या प्रवासावर कोणतीही वाढ नाही. ५००+ किमीचा द्वितीय श्रेणी प्रवासः ०.५ पैसे/किमी, मासिक सीझन तिकीट (एमएसटी) आणि उपनगरीय रेल्वे भाड्यात कोणताही बदल होणार नसल्याची माहिती समोर येते.


About Author

Astha Sutar

Other Latest News