खाजगी एजन्सी नव्हे, भारतीय रेल्वेने आणलं टूर पॅकेज; नेमका खर्च किती, कुठे प्रवास?

इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड एक नवीन आणि खास आंतरराष्ट्रीय रेल्वे टूर घेऊन येत आहे. 'भारत-भूतान मिस्टिक माउंटन टूर'. हा भव्य दौरा 28 जून 2025 पासून सुरू होईल. या टूरबाबत सविस्तर माहिती घेऊ...

भारत-भूतान मिस्टिक माउंटन टूर ही एक अद्भुत आणि आध्यात्मिक अनुभव देणारी सहल आता आयआरसीटीसीकडून सुरू केली जात आहे. ही सहल प्रवाशांना हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य भूतान देशाच्या शांततेचा आणि संस्कृतीचा अनुभव देईल. ही टूर भारतातून सुरू होते आणि भूतानच्या विविध सुंदर भागांत फिरवते. भारतातील उत्तर बंगालमधील जयगाव किंवा बागडोगरा येथून भूतानमध्ये प्रवेश केला जातो. भूतान हा देश “थंड चित्ताचा देश” म्हणून ओळखला जातो, कारण येथे गुन्हेगारीचे प्रमाण अत्यंत कमी असून, “ग्रॉस नॅशनल हॅपिनेस” हे विकासाचे प्रमुख मोजमाप आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड  एक नवीन आणि खास आंतरराष्ट्रीय रेल्वे टूर घेऊन येत आहे – ‘भारत-भूतान मिस्टिक माउंटन टूर’. हा भव्य दौरा 28 जून 2025 पासून सुरू होणार असून, भारतातील तसेच शेजारील भूतान देशातील नयनरम्य स्थळांचा यात समावेश असणार आहे.

कसा असेल प्रवासाचा मार्ग?

या टूरमध्ये थिम्पू, पारो, पुनाखा, आणि बुमथांग ही प्रमुख शहरे पाहता येतील. थिम्पू ही भूतानची राजधानी असून येथे बुद्धा पॉइंट, मेमोरियल चोर्टेन आणि थिम्पू चा बाजार अतिशय प्रसिद्ध आहेत. पारो हे एक निसर्गरम्य ठिकाण असून येथे टायगर्स नेस्ट (तक्तसांग मॉनेस्टरी) ही टेकडीवर वसलेली विख्यात बौद्ध विहार आहे. या विहारापर्यंतचा ट्रेक हे या टूरचे आकर्षण असते. येथील हवा स्वच्छ, निर्मळ असून डोंगरांमध्ये वसलेली ही मॉनेस्टरी जणू स्वर्गातील प्रवेशद्वार भासतं.

पुनाखा हे ठिकाण त्याच्या सुंदर झूल्यांसाठी आणि पुनाखा झोंगसाठी प्रसिद्ध आहे. भूतानमधील झोंग हे प्रशासकीय आणि धार्मिक कार्यासाठी वापरले जाणारे प्राचीन राजवाडे आहेत. भूतानमध्ये शाकाहारी अन्न प्रमुख असून “एमा दात्सी” ही चविष्ट मिरची आणि चीजपासून बनवलेली पारंपरिक डिश आवर्जून चाखायला हवी.या टूरमध्ये भारत आणि भूतानच्या संस्कृतीतील साम्य आणि वैशिष्ट्य दोन्ही दिसतात. दोन्ही देशांतील लोक शांत, मैत्रीपूर्ण आणि निसर्गप्रेमी आहेत. भूतानमध्ये प्लास्टिक बंदी, वनसंवर्धन, आणि स्वच्छतेला खूप महत्त्व दिले जाते, जे पर्यावरणप्रेमी पर्यटकांना खूप भावते.

टूरच्या बुकींग संबंधित माहिती

रेल्वे प्रवास, 3-स्टार हॉटेलमध्ये निवास, शाकाहारी जेवण, AC बसने स्थानिक प्रवास, टूर गाईड व ट्रॅव्हल इन्शुरन्स अशी वैशिष्ट्ये या टूरची असणार आहेत.

बुकिंग “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य” या तत्त्वावर सुरू आहे. प्रत्येक टप्प्यावर सुरक्षा व सुविधा यांचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. एकावेळी 150 प्रवाशी इतकीच क्षमता असल्याचं सांगितलं जात आहे. https://www.irctctourism.com या साईटचा तुम्ही वापर करू शकता.
  • AC-1: ₹1,58,850
  • AC-2 कॅबिन: ₹1,44,892
  • AC-2 टियर: ₹1,29,495
  • AC-3 टियर: ₹1,18,965

बुकींगच्या वेळी वरीलप्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे तुम्हीपण जर पर्यटन प्रेमी असाल, भ्रमंती करायची असेल, आणि त्यासाठी पुरेसे पैसे खर्च करण्याची जर तुमची तयारी असेल तर आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरू शकते.


About Author

Rohit Shinde

Other Latest News