Bhushan Gavai – आज सर्वोच्य न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्य सरकारतर्फे विधीमंडळात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधीमंडळातील दोन्ही सभागृहातील सदस्य आदी उपस्थित होते. बाबासाहेबांनी महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे काम केले. या घटनेमुळं देशातील वंचित घटकाला न्याय दिला आहे. द्रोपद्री मूर्मू ह्या अदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती आहेत. हा त्यांना मान बाबासाहेबांच्या घटनेमुळं मिळाला आहे.
घटनेमुळं सामान्य लोकं मुख्य प्रवाहात..
आज भारतीय राज्य घटनेचं अमृत महोत्सव साजरे होत आहे. याचा सर्वांना आनंद आहे. मला बाबासाहेबांच्या घटनेमुळं सर्वेाच्य पदी जाता आले. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार झाल्यानंतर त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आणि घटना यावर मार्गदर्शन केले. आज माझा हा सत्कार झाला, अनन्यसाधरण महत्व आहे. कारण आज राज्यातील १२ कोटी पेक्षा अधिक जनतेचे मला आज आशीर्वाद मिळाले आहेत. हे माझे मी भाग्य मानतो. मी बाबासाहेबांचा पाईक आहे. असं गवई म्हणाले.

मानवता आणि संवेदनशीलता
मी त्यांची कारकिर्दी जवळून पाहिली आहे. नागपूर झोपडपट्टीचा विषय सरकारी वकील म्हणून त्यांनी सोडवला. मानवता आणि संवेदनशीलता त्यांच्यामध्ये आहे. असं कौतूक मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दल काढले. तर आजचा दिवस अत्यंत आनंदी आहे, आपण सर्वांनी मिळून गवई यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला. गवई यांच्यात खूप साधेपणा आहे. गवई यांचे वडील दादासाहेब गवई हे अत्यंत अभ्यासू व्यक्ती होते. आजातशत्रू होते, हाच गुण भूषण गवई यांच्यामध्ये आला आहे. असं मुख्यमंत्री म्हणाले.
कुटुंबातील एका व्यक्तीचा सन्मान
आजचा दिवस प्रेरणादायी आहे. असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर आपण अनेक चांगले निर्णय दिले आहेत, आपण असे अनेक निर्णय देऊन आमच्यातील वाद आणि नाराजी टाळली आहे. आजचा सत्कार हा अभूतपूर्व आणि इतिहासात नोंद होणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आपल्या घरातील एक व्यक्तीचा आज सन्मान होत आहे. याचा राज्यातील व्यक्तीला आज सार्थ अभिमान आहे. भूषण गवई यांनी सर्वोच्य न्यायालायचा सर्वोच्य पदाचा शपथ घेतली, तो दिवस सोनेरी अक्षरांनी लिहिला गेला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.