पहलगाम हल्ल्याचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ, गोळीबार सुरू होताच ‘अल्लाहू अकबर…’संशयाच्या भोवऱ्यात

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या नव्या व्हिडिओने एकच खळबळ माजली आहे.

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत रोज नवनने अपडेट्स आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता या हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ चर्चेत आहे. विशेष म्हणजे पहिला गोळीबार होताच तिथला झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबरचा घोष करताना दिसत आहे. यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

ऑपरेटरला घेतलं ताब्यात

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये झिपलाइन ऑपरेटर “अल्लाहु अकबर” असे म्हणताना दिसतो, त्यानंतर लगेचच हल्ला सुरू होतो. या घटनेत 28 जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने या ऑपरेटरला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Another video of Pahalgam Terrorist Attack.

People running, getting shot, falling mid-step.

Also observe the zipline operator saying “Allah hu Akbar” just as the first shots go off.

He was at a vantage point, he’d have seen the attack before everyone.

This is pure evil. pic.twitter.com/UrYLbKbExn

— Tapashish Chakraborty (@TapashishC) April 28, 2025

या हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण झाले आहेत. भारताने पाकिस्तानच्या वीजा रद्द केले असून, सीमा बंद केली आहे. पाकिस्तानने या हल्ल्याचा निषेध केला आहे, परंतु भारताने पाकिस्तानवर दहशतवादाला पाठिंबा देण्याचा आरोप केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून हल्ल्याच्या भीषणतेचा आणि दहशतीचा प्रत्यक्ष अनुभव समोर आला आहे.

भारत-पाक संबंध ताणले

या हल्ल्यामुळे भारत पाकिस्तान संबंध तणावपूर्ण अवस्थेत आले आहेत. भारताने युध्दाभ्यास सुरू करताचा चवताळलेल्या पाकीस्तानने तुर्कस्तानकडून आर्थिक आणि लष्करी मदत घेतल्याची माहिती समोर येत आहे. तुर्कस्ताने लढाऊ विमाने आणि दारूगोळा पाकला दिला आहे,तर दुसरीकडे भारताकडूनही मोठ्या हलाचाली सुरू करण्यात आली आहे. या मुळे युद्धाचे सावट आहे.

 


About Author

Rohit Shinde

Other Latest News