कांद्याच्या दरात घसरण कायम, सोलापुर बाजार समितीत 4 रूपये दर

सोलापुरात कांद्याला प्रति किलो केवळ 5 ते 6 रुपये भाव मिळतोय, त्यामुळे राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचं चित्र आहे.

सोलापूर: राज्यातील कांदा प्रश्न शेतकरी आणि राजकारण्याच्या दृष्टीने नेहमीच कळीचा मुद्दा राहिलेला आहे. अशा परिस्थितीत सध्या राज्यातील कांद्याला मिळणारा दर हा चिंतेचा विषय बनला आहे. निर्यातबंदी उठवून झाली, तरी दरांत काही सुधारणा होताना दिसत नाही. दुसरीकडे उन्हाळी कांद्याची बाजार समित्यांमधील आवक देखील वाढली आहे. सोलापूर बाजार समितीत कांद्याला कमी दर मिळत आहे.

सोलापुरात 4 रू. प्रतिकिलो दर

सोलापुरात कांद्याला प्रति किलो केवळ 5 ते 6 रुपये भाव मिळत आहे. आवक कमी असूनही कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. काही शेतकऱ्यांना केवळ 1 ते दीड रुपया प्रति किलो भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त आहेत. एकीकडे अवकाळी पावसाच्या भीतीमुळे शेतकऱ्याने आपला कांदा लिलावासाठी आणला आहे. मात्र कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. सरकारने कांद्याला हमीभाव द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

कांद्याच्या दरातील घसरण – शेतकऱ्यांची चिंता

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्या आर्थिक संकट उभे राहिले आहे. नवीन पिकांच्या मोठ्या आवकामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. डिसेंबर 2024 मध्ये कांद्याचे दर ₹3,500 प्रति क्विंटल होते, जे आता ₹ 400 प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. या घसरणीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल होण्याची शक्यता नाही.

सध्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी गंभीर अडचणीत सापडले आहेत. कांद्याचे बाजारभाव प्रति किलो 4 ते 5 रुपये इतके घसरले असून, उत्पादन खर्चही निघत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करून हमीभाव देण्याची मागणी केली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनही केले. ही परिस्थिती लवकर न सुधारल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान आणखी ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारच्या त्वरित निर्णयांची गरज आहे. सरकारने या समस्येवर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News