मुंबई – गेल्या महिनाभरापासून सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना बँकांकडून पर्सनल लोनची विचारणा वाढली आहे. विविध बँकांकडून पर्सनल लोन हवे आहे का, याची विचारणा मोबाईलवर करण्यात येते. कोणत्याही कागदपत्रांशिवाय हे कर्ज तुमच्या बँक अकाऊंटला जमा होईल, असंही सांगण्यात येतं. अशात अनेक जणं हे कर्ज घेतातही.
अचानक उद्भवलेल्या बाबींमुळे अनेकदा कर्ज घेण्याची वेळ अनेकांवर येते. यात घर खरेदी, मुलांचं शिक्षण, मेडिकल खर्च अशा बाबींचा समावेश असतो. अशा स्थितीत दोन पर्याय आपल्यासमोर असतात. एक असतो पर्सन लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज किंवा दुसरा पर्याय असतो तो म्हणजे टॉप अप लोन म्हणजेच आधीच्या कर्जावर दुसरं कर्ज घेणं.

पर्सनल लोनचे काय आहेत फायदे-तोटे?
फायदे-
01- वैयक्तिक कर्ज तुम्ही कुठल्याही बाबींवर खर्च करु शकता
02- हे कर्ज घेण्यासाठी संपत्ती अथवा घर तारण ठेवण्याची गरज नसते.
03- तुमचा सीबील स्कोअर चांगला असेल तर लगेच उपलब्ध
04- मासिक हप्त्यांत कर्ज चुकवण्याची संधी
तोटे-
01- पर्सनल लोन हे असुरक्षित कर्ज मानण्यात येत असल्याचं याचा व्याज दर अधिक असतो.
02- साधारणपणे पर्सनल लोनसाठी 10 ते 16 टक्के व्याजदराची आकारणी करण्यात येते.
03- असुरक्षित कर्ज मानण्यात येत असल्यानं सुरक्षित कर्जापेक्षा कमी रक्कम कर्ज स्वरुपात मिळते.
04- सीबील स्कोअर चांगला नसेल तर पर्सनल लोन घेण्यात अडचणीउद्भवतात. प्रत्येकाला हे कर्ज सहज उपलब्ध होत नाही.
05- कर्ज घेण्यासाठी नियमित कमाई आणि जुने कर्ज फेडल्याचा चांगला रेकॉर्ड गरजेचा असतो.
टॉप अप लोनचे काय फायदे-तोटे?
फायदे-
01- तुम्ही एखाद्या बँकेकडून गृह कर्ज किंवा सोने तारण कर्ज घेतलं असेल तर लगेच उपलब्ध होते.
02- बँकेकडे आधीपासूनच कर्जदाराचं तारण उपलब्ध असल्यानं याचे व्याज दर पर्सन लोनपेक्षा कमी असतात
03- पर्सनल लोनपेक्षा हे लोन सुरक्षित असल्यानं ( तारण बँकेकडे असल्यामुळे) हे जास्त प्रमाणात मिळते.
04- टॉप अप लोनसाठी वेगळा हप्ता देण्याची गरज नसते, तुमच्या आधीच्या कर्जातच हे लोन जोडण्याची मुभा असते. यासह छोट्या हप्त्यात कर्ज फेडीची योजनाही असते.
तोटे-
01- ज्या बँकेकडून तुम्हाला कर्ज घ्यायचं आहे, त्या बँकेत तुमचे आधीचे कर्ज असणे आवश्यक असते.
02- हे कर्ज तुमच्या आधीच्या तारण कर्जाशी जोडलेले असते. त्यामुळे हे कर्ज फेडले नाही तर तारण वस्तू, घर जप्त करण्याचा अधइकार बँकांना असतो.
03- टॉप अप लोन घेण्यासाठी वेगळी प्रोसेसिंग फी आणि इतर शुल्काची आकारणी होते.
कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक
1. आधार कार्ज, पॅनकार्ड, वोटिंग कार्ड किंना पासपोर्ट
2. पत्त्यासाठी इलेक्ट्रिक बिल
3. सॅलरी स्लीप
4. इन्कम टॅक्स रिटर्न
5. गेल्या सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट
6. घर नावावर असेल तर त्याचे एग्रिमेंट
7. तुमचे फोटो