राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार, बोर्डाची अधिकृत घोषणा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 13 मे 2025 रोजी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. विद्यार्थी आपला निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर १३ मे २०२५ (मंगळवारी) रोजी दुपारी १.०० वाजता पाहू शकतात. त्यामुळे निकालासाठी विद्यार्थ्यांना अवघे काही तास वाट पाहावी लागणार आहे.

कुठे पाहाल निकाल? 

  • https://results.digilocker.gov.in
  • https://sscresult.mahahsscboard.in
  • http://sscresult.mkcl.org
  • https://results.targetpublications.org
विद्यार्थी त्यांच्या विषयानुसार मिळालेले गुण या वेबसाईटवर पाहू शकतात. तसेच, निकालाची प्रिंट देखील काढू शकतात. तसेच https://mahahsscboard.in (“in school login”) या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

मंडळाने निकालासोबत काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत

ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची पडताळणी करायची आहे किंवा उत्तरपत्रिकांची झेरॉक्स कॉपी हवी आहे, ते त्यासाठी अर्ज करू शकतात. तसेच, ज्यांना पेपर पुन्हा तपासायचा आहे, म्हणजेच पुनर्मूल्यांकन करायचे आहे, ते देखील अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि ती मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ मे २०२५ आहे. अर्ज भरताना Debit Card/ Credit Card/UPI/ Net Banking चा वापर करून शुल्क भरता येईल.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News