तुम्हालाही सतत उचकी येते का? मग ‘हे’ घरगुती उपाय करून बघा लगेच मिळेल आराम

जर वारंवार उचकी येत असेल तर काही उपाय आहेत जे आपल्याला आराम देऊ शकतात.

जेव्हा कधी आपल्याला उचकी येते तेव्हा आपल्याला वाटतं की कोणीतरी आपली आठवण काढतंय. पण हीच जर उचकी जास्त किंवा वारंवार येत राहिली तर खूप चिडचिड होते. खरंतर, उचकी येणं हे अगदी सामान्य लक्षण आहे. पण कधीकधी, काही कारणास्तव, काही तासांपर्यंत अधूनमधून उचक्या येत राहतात. ज्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. उचकी थांबवण्याचे उपाय नेमके कोणते ते जाणून घेऊयात…

आल

जर तुम्हालाही अधूनमधून उचकी येत असेल. तर काळजी करण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही आल्याचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला तोंडात एक किंवा दोन आल्याचे तुकडे ठेवावे लागतील. आल्याचा तुकडा सतत चोखत राहा, यामुळे उचकीची समस्या दूर होईल. थोडसं आल चघळल्याने किंवा त्याचा रस प्यायल्यानेही उचकी कमी होते. 

लिंबू

लिंबाचा वापर तुमच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की उचकी येत असेल तरीही तुम्ही लिंबू वापरू शकता. लिंबाचा एक तुकडा तोंडात ठेवावा लागेल. लिंबाचा तुकडा सतत चोखत राहा, याचा तुम्हाला अधिक फायदा मिळेल.

मध

मध हे अनेक आजारांवर उपचार करणारे औषध आहे. कारण त्यात अनेक औषधी गुणधर्म आढळतात. उचकी येत असल्यास, मधाचा वापर त्वरित आराम देऊ शकतो. लिंबाच्या रसासोबत मधाचा वापर केल्यास, उचकी थांबण्यास मदत होऊ शकते. उचकी लागल्यावर, एका चमचा लिंबाच्या रसाला एक चमचा मधासोबत मिसळून सेवन करा. मध खाल्ल्यानेही उचकीवर नियंत्रण ठेवता येते.

पुदिना

पुदिना तुमच्या पचनासाठी चांगला मानला जातो. पण जर तुम्हाला उचक्यांची समस्या असेल तर तुम्ही पुदिन्याचा वापर करू शकता. पुदिन्याची पाने चघळून खा किंवा त्याचा रस प्या.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News