लाडक्या बहिणी अजून कमी होणार? प्राप्तिकर विभाग महिलांच्या उत्पन्नाची माहिती देण्यास राज्य सरकारला तयार

ज्यांचे महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक आहे अशा कर भरणाऱ्या महिलांनीही अर्ज केले होते. त्यामुळं एकूण संख्या २ कोटी ५२ लाखांच्या घरात गेली. त्यामुळं आता ज्या महिला कर भरतात, अशा महिला या योजनेतून अपात्र ठरणार आहेत.

Ladki Bahin Yojana : महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र यानंतर यात गैरमार्गाने लाभ घेतलाचे समोर आले होते. यामुळं राज्य सरकार याला आळा घालण्यासाठी आक्रमक झाल असून, राज्याने प्राप्तिकर विभागाला महिलांची उत्पन्नाची माहिती मिळावी, यासाठी प्रस्ताव पाठवला होता, यानंतर आता प्राप्तिकर विभाग माहिती देण्यास तयार असून, यामुळं आणखी महिला अपात्र होण्याची शक्यता आहे.

आयकर भरणाऱ्या महिलांना लाभ नाही

दरम्यान, प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. लाभार्थीच्या व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यामुळे प्राप्तिकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न) डेटाचा वापर करून प्राप्तिकर भरणाऱ्या महिलांची यादी तयार करून त्यांना मिळणारा लाभ महिला व बालविकास विभागाकडून  बंद होऊ शकतो. अशी माहिती समोर येत आहे.

२.५ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न, तरी बहिणींचे अर्ज

दुसरीकडे या योजनेत अनेक निकष होते. जसे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित  कमी असावे, अशी अट होती. मात्र, ज्यांचे महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक आहे अशा कर भरणाऱ्या महिलांनीही अर्ज केले होते. त्यामुळं एकूण संख्या २ कोटी ५२ लाखांच्या घरात गेली. त्यामुळं आता ज्या महिला कर भरतात, अशा महिला या योजनेतून अपात्र ठरणार आहेत.


About Author

Astha Sutar

Other Latest News