mumbai – पावसाबाबत एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे. मागील आठवड्यात राज्यातील काही भागात सुसाट्याचा, वादळी वारा आणि गारपीठसह पावसाने राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. अवकाळी पावसामुळं उकाड्याने हैराण झालेल्यांना गारव्याचा दिलासा मिळाला होता. गारवा मिळाला होता. यावेळी या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यातील अकरा जिल्ह्यांसह, मुंबई आणि उपनगरात मुसळधार, पुढील 3 दिवसांसाठी चक्रीवादळासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.

‘यलो अलर्ट’ कुठे?
दुसरीकडे कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गध्ये आज ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ताशी ३५ ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. राज्यातील ११ जिल्ह्यासह मुंबई, ठाणे आणि उपनगरातही पुढील ४८ तासासाठी म्हणजेच आज आणि उद्या हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आलेला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. लोकांनी सतर्क राहावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पावसाचा इशारा कुठे?
पुढील ३ दिवस राज्यातील ११ जिल्ह्यामध्ये ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या अकरा जिल्ह्यामध्ये नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, जळगाव, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’ हवामाने विभागाने जारी केला आहे.
गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाच्या हजेरीमुळं राज्यातील विविध भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात केळी, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरीचं मोठे नुकसान झाले आहे. तर नाशिकमध्ये द्राक्षे, कांद्याचे, कोकणाच आंब्याचे मोठे नुकसान झालेय.