हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचे खूप महत्त्व आहे. वास्तुनुसार, घरातील दिशेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. वास्तुनुसार वस्तू ठेवल्याने घरात समृद्धी येते. यासोबत आयुष्य आनंदाने जाते. वास्तुशास्त्रात, दिशा आणि वस्तू योग्य ठिकाणी असणे खूप महत्वाचे आहे. जर गोष्टी योग्य दिशेने ठेवल्या नाहीत तर त्याचा व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होतो. उन्हाळ्याच्या दिवसात माठातील थंड पाणी शरीरासाठी फायदेशीर तर आहेच, पण माठ योग्य ठिकाणी ठेवल्यास घरात सौख्य, शांती आणि समृद्धी देखील येते. मात्र हा माठ जर चुकीच्या दिशेला ठेवला, तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. चला जाणून घेऊयात पाण्याचा माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती?
पाण्याचे भांडे या दिशेला ठेवा
घरात पाण्याचा माठ ठेवण्याची योग्य दिशा उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशा मानली जाते. या दिशांमध्ये माठ ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, सुख-समृद्धी येते आणि देवी-देवता प्रसन्न होतात. ईशान्य कोपरा (उत्तर-पूर्व दिशा) देखील पाण्याचा माठ ठेवण्यासाठी शुभ मानला जातो. या कोपऱ्यात माठ ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात सुख-शांती नांदते.

माठात पाणी नेहमी भरून ठेवा
या दिशेला पाण्याचा माठ ठेवू नये
दक्षिण दिशा नकारात्मक ऊर्जा दर्शवते, त्यामुळे या दिशेला माठ ठेवू नये.
स्वच्छता
पाण्याचा माठ नेहमी स्वच्छ राहील या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या. तसेच, अशुद्ध ठिकाणी जसे की, शौचालयाच्या जागी, बूटांच्या जागी पाण्याचा माठ ठेवू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. माठ नेहमी स्वच्छ ठेवावा, जेणेकरून घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ नये.
माठातील पाणी पिण्याचे अनेक फायदे
माठातील पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, ज्यामुळे ते आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. मातीचे भांडे पाण्यातील हानिकारक पदार्थ आणि जीवाणू काढून पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध करते, ज्यामुळे ते पिण्यासाठी सुरक्षित होते. माठातील पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. ते पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर ठेवते. माठातील पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते, विशेषतः उन्हाळ्यात. माठातील पाणी उष्माघात होण्याचा धोका कमी करते. माठातील पाणी शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देते, ज्यामुळे उन्हाळ्यात शरीराला आराम मिळतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)