“वेळ आलीयं…, महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे…”, शिवसेनाच्या (ठाकरे) या पोस्टने राज-उद्धव एकत्र येण्याची दाट शक्यता?

"वेळ आलीयं, एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी!" अशी पोस्ट शिवसेना ठाकरे गटाकडून सोशल मीडियाच्या एक्स हँडलवरून करण्यात आली आहे. या पोस्टवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबई – दोन ठाकरे बंधू अर्थात राज-उद्धव एकत्र येण्यासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत बॅनरबाजी केली. महाराष्ट्रातील लोकांची ही अशीच भावना असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, दोन्ही ठाकरे बंधू परदेशात असल्यामुळे यावर निर्णय हे दोन ठाकरे बंधू घेऊ शकतात. असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून एक सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टवरून चर्चाना उधाण आलं असून, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी!

दरम्यान, “वेळ आलीयं, एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी!” अशी पोस्ट शिवसेना ठाकरे गटाकडून सोशल मीडियाच्या एक्स हँडलवरून करण्यात आली आहे. या पोस्टवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, दोन ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का? यावर तर्कवितर्क लावले जाताहेत. सध्या दोन्ही ठाकरे बंधू हे सुट्टीच्या निमित्ताने परदेशात आहेत. तर युतीबाबत पक्षाकडून कोणीही भाष्य करू नये, असा संदेश परदेशातून राज ठाकरे यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. दोन्ही ठाकरे बंधूंतील एकत्र येण्याचा चर्चा मागील आठवड्यात सुरू असताना, मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. त्यामुळे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना विराम मिळाली होता. परंतु यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाकडून सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्यावरुन चर्चा रंगताना दिसताहेत.

दोन्हीकडून पोस्टरबाजी…

यानंतर आता दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का? यावर चर्चा सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाकडून कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बॅनरबाजी केली आहे. यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची फोटो झळकत आहेत. तर दुसरीकडे काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन ठाकरे बंधूंनी एकत्र आले पाहिजे. अशी कार्यकर्त्यांचे भावना होती. दरम्यान, वरळीत एका कार्यकर्त्यांने याबाबत मोठमोठे बॅनरही लावले होते. पण दोघांकडूनही याला प्रतिसाद मिळाला नव्हता.

काय म्हणाले राज-उद्धव?

“माझ्यासाठी मतभेद आणि वाद हे क्षुल्लक गोष्ट आहे. महाराष्ट्र ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे”, असं राज ठाकरेंनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. यानंतर याला उद्धव ठाकरेनी “आमच्या कधी भांडणं  नव्हतीच…, चला मिटवून टाकली” असं उद्धव ठाकरेंनी याला प्रतिसाद दिल्यानंतर महाराष्ट्रातील दोन मोठे नेते आणि दोन ठाकरे घराण्यातील दोन बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत होती. मात्र ही चर्चा थांबली होती. पण पुन्हा ठाकरे गटाने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर चर्चाना उधाण आलं आहे.

उद्धव ठाकरे युतीबाबत कमालीचे सकारात्मक…

दुसरीकडे राज-उद्धव एकत्र यावीत, ही महाराष्ट्रातील शेवटच्या गावातील शेवटच्या माणसाची आहे. आणि उद्धव ठाकरे हे युतीबाबत कमालीचे सकारात्मक असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. परंतु पहलगाम हल्यानंतर या चर्चां कुठेतरी थांबल्या होत्या. मात्र आता शिवसेना ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येणार का? पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? या चर्चांना उधाण आलं असून, राजकीय वर्तुळात चर्चा जोरदार रंगू लागल्या आहेत.


About Author

Astha Sutar

Other Latest News