Malegaon Sugar Factory Election Result – गेल्या १५ दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले ते म्हणजे ली माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक. हि निवडणूक अजित पवार आणि शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जाते. तर पॅनल आणि उमेदवारांसाठी चक्क मुंबई, पुण्यात बैठका घेण्यात आल्या. अजित पवार आणि शरद पवार पक्षातील दोन्ही नेत्यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं आहे, त्यामुळं ही निवडणूक महत्वाची मानली जाते. दरम्यान, या निवडणुकीतील पहिला निकाल समोर आला आहे.
पहिला निकाल अजितदादांच्या बाजूनी…
दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. निवडणुकीतील पहिला कौल अजितदादांचा बाजूनी लागला आहे. ब प्रवर्गातील ९१ मते मिळवत अजित पवारांचा उमेदवार विजयी झाला आहे. तर विरोधी उमेदवाराला केवळ १० मते मिळाली आहेत. सर्वात पहिला निकाल हा अजित पवार यांच्या पॅनलच्या बाजूने जाहीर झाला आहे. या जागेवर अजित पवार विजयी होणार हे निर्विवाद होते.

पंचवार्षिक निवडणुकीसाठी चौरंगी लढत…
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चौरंगी लढत झाली होती. आज या निवडणुकीची मतमोजणी बारामतीतील प्रशासकीय भवन मधील अभियांत्रिकी भवन येथे सुरू झाली आहे. त्यामुळे ही जागा सोडून इतर जागांसाठी प्रचार झाला होता. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीमध्ये बारीक लक्ष घातले आहे. त्यांनी निळकंठेश्वर पॅनलचा विजय झाल्यास आपणच या कारखान्याचे अध्यक्ष होणार असल्याची म्हटले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्या पॅनलमध्ये मुख्य लढत
अजित पवार यांचे निळकंठेश्वर पॅनल विरुद्ध चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनलमध्ये मुख्य लढत होणार आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कोणाला कल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.