आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान, राज्य शासनाकडून मान्यता

पालखी मार्गावर आरोग्य कक्ष आणि फिरती शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध आदी व्यवस्था पालिकेसह विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांकडून करण्यात आली आहे. तसेच पालखांच्या स्वागत आणि वारीची संपूर्ण तयारी झाली आहे.

Ashadhi Ekadashi Wari  2025 : पंढरपूरचा विठ्ठल हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते. आता पंढरपूरच्या आषाढी वारीचे वेध विठ्ठल भक्तांना लागले आहेत. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. पंढरपूरची वारी हे भक्तांसाठी एक पर्वणी असते. वारी करण म्हणजे जन्माला आल्याचे सार्थक होणे, अशी भावना भक्तामध्ये आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं म्हटले जाते. त्यामुळं अनेक दिंड्या आणि पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होताहेत. दरम्यान, आषाढी एकादशी वारीतील दिंड्यांसाठी राज्य शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

१४०० दिंड्यांना प्रति दिंडी २०,००० रुपये…

दरम्यान, या वारीमध्ये अनेक संतांच्या पालख्या सामील होत असतात. आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी यांचे संगम पुण्यात होणार आहे. त्यामुळं पुण्यात आज भक्तांची मांदियाळी जमली आहे. आगामी आषाढी एकादशी वारी करिता तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या एकूण १४०० दिंड्यांना प्रति दिंडी २०,००० रुपये या प्रमाणे २ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

वारीसाठी शासन निर्णय…

दुसरीकडे वारी अनुदानासाठी निधी हा अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत वितरित करण्यात आलेला नसून सर्वसाधारण योजनेतील जाहिरात व प्रसिद्धी राखीव असलेल्या निधीतून उपलब्ध करण्यात आला आहे. या संदर्भातील १४ जून आणि १७ जून २०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गासाठी आरक्षित निधीवर कोणताही अन्याय झालेला नाही, असे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने स्पष्ट केले आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News