मुंबईतील चौपाट्या बंदची अफवाच, ‘या’ महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची असणार करडी नजर

सीसीटीव्हीद्वारेही नियंत्रण कक्षातून मुंबई पोलिस बारीक लक्ष ठेवून आहेत. तसेच परदेशी नागरिकांची आणि ओळख लपवून शहरात राहणाऱ्यांची पोलिकांसकडून शोधमोहीम सुरु आहे.

Mumbai Chowpatty – सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे. दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळं देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक तैनात करण्यात आली आहे. या काळात विविध अफवाही समोर येत आहेत. दरम्यान, मुंबईतील दादर, गिरगाव, जुहू चौपाटी बंद असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. पण या मुंबईतील कोणत्याही चौपाट्या बंद राहणार नाहीत. युद्धच्या कालावधीत खोट्या अफवा पसरवल्या जाताहेत, या खोट्या माहितीवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही मुंबई पोलिसांनी केले आहे.

महत्त्वाची ठिकाणी पोलिसांची करडी नजर…

दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिस यंत्रणा अधिक अलर्ट करण्यात आली आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई ही नेहमीच अतिरेक्यांच्या टार्गेट लिस्टवर असते. मुंबईतही हाय अलर्ट असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यामुळं मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे सागरी किनारा, रेल्वे स्थानकं, विमानतळ, बस डेपो आदी ठिकाणी पोलिस यंत्रणा सज्ज असून, सुरक्षा अधिक कडक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सीसीटीव्हीद्वारे पोलिसांचे लक्ष…

दुसरीकडे मुंबई पोलिसांनी भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने सागरी किनारे, बंदरे, गोदी आणि समुद्रमार्ग यांसह सर्व किनारपट्टी भागांमध्ये गस्त वाढवली आहे. सुरक्षा अधिक तैनात करण्यात आली आहे. धोका लक्षात घेता मुंबई पोलिसांनी अन्य सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. संशयित लोकांची कसून चौकशी आणि झाडाझडती केली जात आहे. तसेच सीसीटीव्हीद्वारेही नियंत्रण कक्षातून मुंबई पोलिस बारीक लक्ष ठेवून आहेत. तसेच परदेशी नागरिकांची आणि ओळख लपवून शहरात राहणाऱ्यांची पोलिकांसकडून शोधमोहीम सुरु आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News