Ladki Bahin Yojana – लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली होती. या योजनेला महाराष्ट्रात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. नुकताच एप्रिल महिन्याचा लाडक्या बहिणींचा हप्ता खात्यात जमा झाला आहे. यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठा निर्णय सरकार घेण्याच्या विचारात आहे. परिणामी या निर्णयामुळे लाडक्या बहिणीला आर्थिक पाठबळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
योजनेच्या माध्यमातून बहिणीला किती कर्ज?
दरम्यान, आता लाडक्या बहिणीला ४० ते ५० हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून कर्ज देण्याचा सरकारचा विचार आहे. जेणेकरून एवढी एक रक्कम मिळाल्यानंतर ती लाडकी बहीण काहीतरी उद्योग-व्यवसाय करू शकेल. आणि तिची आर्थिक परिस्थिती सुधारेल. म्हणून ४० ते ५० हजार रुपये कर्ज देण्याचा आमच्या सरकारचा विचार आहे. याबाबत काही बँकांची नावे समोर आलेली आहेत. बँकांच्या अधिकाऱ्यासोबत आमची बोलणी सुरू आहेत. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

बहिणीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत…
सध्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देत आहे. याच पैशातून राज्यातील काही महिलांनी छोटे-मोठे उद्योग-धंदे सुरू केले आहेत. तसेच त्यांच्या संसाराला दीड हजार ही रक्कम हातभार लावत आहे. त्यामुळे आता एकदम ४०-५० हजार रुपये मिळाले तर लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करू शकतील आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल…, आर्थिक सुबत्ता येईल. त्यामुळे सरकारचा हा निर्णय अतिशय चांगला असल्याचेही लाडक्या बहिणीतून प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे सरकारने २१०० रुपयाचे जे आश्वासन दिले, ते २१०० रुपये कधी देणार? असा सवाल ही काही लाडक्या बहिणी विचारत आहेत.