Drain Cleaning – महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास आता अवघा एक महिना बाकी आहे. अवकाळी पावसानेही महाराष्ट्रसह मुंबईत हजेरी लावली आहे. पावसाळा मुंबई म्हटले की मुंबईची तुंबई हे दरवर्षी ठरलेले चित्र आहे. हे पाणी तुंबू नये… मुंबईत पाणी साचू नये यासाठी पालिका प्रशासनकडून विविध कामं हाती घेतली जातात. यासाठी अगोदर दोन ते तीन महिन्यापूर्वी मुंबईतील नाले सफाईंची काम करण्यात येतात. मात्र अद्यापपर्यंत केवळ ४७ टक्केच नाले सफाई झाल्याचे समोर आले आहे.
नाले सफाईचे आव्हान…
दरम्यान, नाले सफाईचे कंत्राटदार व्यवस्थित काम करत नसल्यामुळे मुंबईत पाणी तुंबले जाते. नाले सफाई करण्यास कंत्राटदर विलंब लावतात. तसेच काम व्यवस्थित न केल्यामुळे त्यांच्या विरोधात भाजपा नेत्यांनी तक्रारही दाखल केली होती. मात्र आता पावसाला एक महिन्याचा अवधी बाकी असताना मुंबईत पालिका प्रशासनाकडून केवळ 47% नाले सफाई झाली आहे, त्यामुळे उर्वरित नाले सफाई करण्याचं आव्हान मुंबई पालिका प्रशासनासमोर आहे.

तीन वर्षापासून प्रशासन…
दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने नुकताच निर्वाळा दिला आहे की, राज्य निवडणूक आयोगाने चार आठवड्याच्या आधी राज्यातील रखडलेल्या पालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा. त्यामुळे यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होण्याचे शक्यता आहे. पण गेल्या तीन वर्षापासून पालिकेत महापौर नाही. निवडणुका न झाल्यामुळे प्रशासन आहे. पण आता केवळ ४७ टक्केच नाले सफाई झाली आहे. त्यामुळं उर्वरित नाले सफाई पावसाआधी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.