MHADA Lottery : आयुष्यात प्रत्येकाला वाटते की, आपले एक हक्काचे आणि स्वप्नातले घर असावे. असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न सगळ्यांचेच पूर्ण होते असे नाही. मात्र आता जर तुम्ही घर घेण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण अगदी स्वस्तात तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण म्हाडाकडून 4000 घरांची लॉटरी लवकरच निघणार आहे.
घरे कुठल्या ठिकाणी?
दुसरीकडे म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जुलै महिन्यात चार हजार घरांची लॉटरी निघणार आहे. यामध्ये मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याण येथे तब्बल 2500 घरांची लॉटरी निघणार आहे. ही घरे खासगी विकासकाकडून म्हाडाला मिळणार आहेत. तर उर्वरित घरे ही ठाण्यात असणार आहेत. अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, ठाण्यातील चितळसर परिसरात म्हाडाने इमारती बांधल्या आहेत. ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी 1173 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. या घरांमध्ये 20 टक्के सर्वसमावेशक योजना तसेच 15 टक्के एकात्मिक गृहनिर्माण योनजेच्या अंतर्गत घरांचा समावेश असणार आहे.

घरांची लॉटरी कधी निघणार?
दरम्यान, मुंबईत किंवा उपनगरात आपले स्वत:चे घर असावं असं प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र, घरांच्या किंमती गगनाला भिडल्याने आणि घरांच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांना घर खरेदी करणे शक्य होत नाही. मात्र म्हाडाकडून तुम्ही स्वस्तात घर खरेदी करु शकणार आहात. मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जुलै 2025 मध्ये 4000 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी निघण्याची शक्यता आहे. म्हाडा घरांची लॉटरी काढण्याचा विचारात आहे.