केदारनाथ हेलिकॉप्टर अपघात : यवतमाळच्या पती पत्नीसह चिमुरडीचा मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांवर काळाला घाला

राजकुमार जैस्वाल यांचा मुलगा विवान हा पांढरकवडा इथं आजोबांजवळ थांबला होता. त्यामुळं तो बचावला. एका वर्षापूर्वी जैस्वाल कुटुंबीयांनी राजकुमार यांच्या मुलीचं काशी असं नामकरण केलं होतं. काशीच्या नावानं वणीत काशी शिवमहापुरान प्रदीप मिश्रा यांच्या कथेचं आयोजन केलं होतं.

Kedarnath Helicopter Crash गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं लंडनला जाणारे विमानाचा अपघात होऊन जवळपास 280 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असतानाच आता रविवारी उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या तीन भाविक हे महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे माहिती समोर येत आहे.

यवतमाळमध्ये शोककळा…

दरम्यान, या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात राज्यातील तीन जण आहेत. एकूण सात जण मृत्य़ूमुखी पडले आहेत. तर अनेक जण जखमी आहेत. जखमीवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, अपघाताची बातमी कळताच यवतमाळमध्ये शोककळा पसरली आहे. रविवारी सकाळी केदारनाथ मार्गावर झालेल्या हेलिकॉप्टरच्या अपघातात वणी इथले राजकुमार जैस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जैस्वाल, त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी जैस्वाल यांच्यासह एकूण सात जणांचा मृत्यू झालाय. केदारनाथ दर्शनासाठी गेलेल्या यवतमाळच्या जयस्वाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय. त्यामुंळ यवतमाळमध्ये शोककळा पसरली आहे.

अपघाताचे कारण काय?

गुजरातमध्ये विमान अपघातातील कुटुंब अजून सावरली नाहीत. या घटना ताजी असताना आता केदारनाथ येथे मोठा हेलिकॉप्टर अपघात घडला आहे. दरम्यान, खराब हवामानामुळं ही दुर्घटना घडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळं केदारनाथ यात्रेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. हेलिकॉप्टर गौरीकुंडच्या जंगलात कोसळलं. सध्या जखमीवर उपचार सुरु आहेत. मात्र या अपघाताची चौकशी करण्यात येत आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News