NTA कडून NEET UG 2025 चा निकाल जाहीर, कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या

NEET UG २०२५ परीक्षा ४ मे २०२५ रोजी घेण्यात आली. या परीक्षेत २०.८ लाख उमेदवार बसले होते.

 How to check NEET UG Result 2025:   नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज म्हणजेच १४ जून २०२५ रोजी NEET UG २०२५ चा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी, देशभरातून २०.८ लाखांहून अधिक उमेदवारांनी या परीक्षेत भाग घेतला होता. जी MBBS, BDS, BAMS, BSMS, BUMS आणि BHMS सारख्या पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आली होती.

 

NEET UG चा निकाल कुठे तपासायचा?

निकाल जाहीर होताना, सर्व्हर डाउन असू शकतो किंवा वेबसाइटवर जास्त ट्रॅफिक असल्याने वेबसाइट स्लो असू शकते. पण घाबरू नका, विद्यार्थी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटना भेट देऊन त्यांचे निकाल सहजपणे तपासू शकतील…

-neet.nta.nic.in

-nta.ac.in

-examinationservices.nic.in

निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना यापैकी कोणत्याही वेबसाइटवर त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून लॉग इन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

 

NEET UG निकाल कसा तपासायचा?

 

सर्वप्रथम, उमेदवारांना neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

होमपेजवर, तुम्हाला “NEET UG 2025 निकाल” या लिंकवर क्लिक करावे लागेल.

आता तुमचा प्रवेशपत्र क्रमांक आणि जन्मतारीख यासारखे क्रेडेन्शियल्स एन्टर करा.

निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल, जो डाउनलोड आणि प्रिंट केला जाऊ शकतो.

 

NEET UG निकाल २०२५ परीक्षा कधी घेण्यात आली?

NEET UG २०२५ परीक्षा ४ मे २०२५ रोजी घेण्यात आली. या परीक्षेत २०.८ लाख उमेदवार बसले होते. ही परीक्षा भारतातील ५५७ शहरांमधील ४,७५० केंद्रांवर आणि परदेशातील १४ केंद्रांवर घेण्यात आली. ही परीक्षा हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि तमिळ, तेलुगू, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, मल्याळम, ओडिया, पंजाबी आणि आसामी यासारख्या अनेक प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात आली होती.


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News