बऱ्याचदा कबुतरे घराच्या बाल्कनीत येतात आणि ती जागा घाण करतात, ज्यामुळे तुम्हाला त्या जागेवर पाय ठेवावासा वाटत नाही. विशेषतः कबुतरे बाल्कनीत बसलेले दिसतात. अनेकदा कबुतरं बाल्कनीत येतात आणि घाण करतात. त्यामुळे बाल्कनीत बसावंसं देखील वाटत नाही. कबुतरांना कितीही हाकलून लावलं तरी ते परत येतात आणि पुन्हा त्याच जागी बसतात. मग आता प्रश्न असा आहे की, या कबुतरांना कायमचे कसे हाकलून लावायचे…जर कबुतरे तुमच्या बाल्कनीत घरटे बनवत असतील, तर त्यांना हाकलण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कबुतरांना तुमच्या बाल्कनीपासून दूर ठेवू शकता.
जाळी किंवा तारांचे जाळे
कबूतर बाल्कनीत घरटे बनवत असतील, तर त्यांना हाकलण्यासाठी जाळी किंवा तारांचे जाळे हा एक प्रभावी उपाय आहे. हे जाळे कबुतरांना बाल्कनीत प्रवेश करण्यापासून रोखते आणि त्यांना दुसरे घर शोधायला भाग पाडते. बाल्कनीमध्ये जाळी किंवा तारांचे जाळे लावून, कबुतरांना तिथे येऊन बसणे किंवा घरटे बनवणे कठीण होऊ शकते. बाल्कनीच्या रेलिंगवर किंवा इतर ठिकाणी जाळी किंवा काटेरी तारेचा वापर करा, जेणेकरून कबुतरांना आत येणे कठीण होईल.

कडुलिंबाचे तेल किंवा व्हिनेगर
कडुलिंबाचे तेल किंवा व्हिनेगरचा स्प्रे बाल्कनीमध्ये मारल्यास, कबुतरांना त्याचा वास आवडत नाही आणि ते त्या ठिकाणापासून दूर राहतील. बाल्कनीत कडुलिंबासारखी तीव्र वासाची रोपे लावल्यास, कबुतरांना तेथे येणे टाळता येते.
तीव्र वासांचा वापर
नियमित स्वच्छता
कबुतरांना बाल्कनीतून हाकलण्यासाठी आणि घरटे बनवण्यापासून रोखण्यासाठी, नियमित स्वच्छता आवश्यक आहे. कबुतरांना घाण आणि कचरा आवडतो. त्यामुळे, बाल्कनी नियमितपणे स्वच्छ करा. बाल्कनी स्वच्छ ठेवा. कबुतरांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी जसे की, अन्न किंवा कचरा बाल्कनीमध्ये साठू देऊ नका.
मध किंवा डिंक
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)