बहुप्रतिक्षित असा दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 94.10 टक्के असून यंदाच्या निकालात देखील मुलींनी बाजी मारल्याचे चित्र आहे. विभागनिहाय पाहायचे झाल्यास या निकालात कोकण विभाग आघाडीवर आहे, तर नागपूर विभागाने सुमार कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येतील, असं मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी स्पष्ट केलं आहे.
यंदाच्या निकालात मुलींची बाजी
गेल्या अनेक वर्षांपासूनच रेकॉर्ड यंदा देखील अबाधित राहिला आहे, कारण, यंदाच्या निकालात देखील मुलींनी बाजी मारली आहे. उत्तीर्ण झालेल्यी मुलींची टक्केवारी 96.14 अशी आहे, तर मुलांची टक्केवारी 92.21 अशी आहे.

विभागनिहाय निकालाची टक्केवारी किती?
पुणे विभाग: 94.81 टक्के
नागपूर विभाग : 90.78 टक्के
संभाजीनगर विभाग : 92.82 टक्के
मुंबई विभाग: 95.84 टक्के
कोल्हापूर विभाग : 96.78 टक्के
अमरावती विभाग : 92.95 टक्के
नाशिक विभाग : 93.04 टक्के
लातूर विभाग : 92.77 टक्के
कोकण विभाग : 99.82 टक्के
यंदाच्या निकालाची वैशिष्ट्ये
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,16,539 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 94.10 आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 28,512 खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 28,020 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 22,518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 80.36 आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 24,376 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23,954 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 9,448 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 39.34 आहे