कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी येथील विमानतळाचा विस्तार लवकरच होणार, 8 वाहनतळ सुद्धा उभारणार

नाशिकपासून शिर्डी विमानतळ जवळ असल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वेळेस हवाई मार्गेने येणाऱ्या भाविकांना शिर्डी विमानतळ सोईचे होणार आहे.

मुंबई : शिर्डी येथील विमानतळाच्या विस्ताराबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या धरतीवर भाविकांची गर्दी लक्षात घेता, शिर्डी विमानतळ येथे दोन हेलिपॅड तसेच 8 वाहनतळ उभारण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त शिर्डी विमानतळाचे विस्तारीकरणाला बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. अमरावती येथे नुकतेच व‍िमानतळाचे उद्घाटन झाले. अमरावती येथे उद्योगाचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारत असल्याने या ठिकाणची धावपट्टी वाढविणे आवश्यक आहे.

अमरावती विमानतळाचेही विस्तारीकरण होणार…

दरम्यान, नुकत्याच सुरू झालेल्या अमरावती विमानतळाचे उद्घाटन काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. त्यामुळे येथेही धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. यामध्ये दोन हेलिपॅड यासह 8 वाहनतळे टर्मिनलच्या अद्यावतीकरणाचा समावेश आहे. याचा फायदा आगामी कुंभमेळ्यादरम्यान येणाऱ्या विमाने आणि हेलिकॉप्टर सेवेसाठी होणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिकपासून शिर्डी विमानतळ जवळ असल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वेळेस हवाई मार्गेने येणाऱ्या भाविकांना शिर्डी विमानतळ सोईचे होणार आहे. शिर्डी येथील विमानतळाच्या कार्गो टर्मिनलचे काम वेगाने सुरू आहे. संभाव्य गर्दीचा विचार करून आणि नाशिक येथील विमानतळाची क्षमता लक्षात घेता शिर्डी विमानतळाचे विस्तारीकरण होणार आहे.

राज्यातील 8 प्रस्ताव केंद्राकडे…

दुसरीकडे प्रादेशिक जोडणी योजना (रिजनल कनेक्टिव्हीटी स्किम) अंतर्गत सध्या राज्यात 16 मार्गांवर विमानसेवा सुरू आहेत. कोल्हापूर, नांदेड, धुळे, रत्नागिरी आणि अकोला येथील विमानतळाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. उड्डाण योजनेअंतर्गत राज्यातील 8 प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. दरम्यान, चंद्रपूर येथील विमानतळावर चार्टड विमाने उतरू शकतील, अशी सुविधा तयार करण्यासाठी तेथील धावपट्टी वाढविण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे चंद्रपूर येथील धावपट्टीचा विस्तार देखील लवकरत होणार आहे. याव्यतिरिक्त कराड येथे नाईट लँड‍िंगची सुविधा देखील सुरु करण्याबाबत सरकारचा विचार आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News