मुंबई : आरोग्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गेल्या आठवड्यात अपघातग्रस्तासाठी १ लाख रुपयांचा कॅशलेस विम्याची घोषणा केल्यानंतर आता कोल्हापूर आणि चंद्रपूर येथे प्रायोगिक तत्त्वावर ‘स्वस्थ जन्म अभियान’ राबवणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माहिती दिली आहे. महिलांच्या गर्भधारणेपूर्वी या महत्वपूर्ण घटकांचे अनुकूलन व्हावे, यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रथम चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करून ‘स्वस्थ जन्म अभियान’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘माझे आरोग्य, माझ्या हाती’ या अभियानांतर्गत एका बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
महिलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत…
दरम्यान, राज्यातील शहरी व ग्रामीण भागात स्त्रीयांनी याकडे लक्ष द्यावे. महिलांच्या बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), रक्तदाब,हिमोग्लोबिन प्रमाण, थायरॉईड संप्रेरकांचे कार्य आणि रक्तातील साखरेचे प्रमाण या महत्त्वपूर्ण घटकांवर लक्ष राहावे. रक्तातील साखरेचे प्रमाण या महत्त्वपूर्ण घटकांवर राज्यातील शहरी व ग्रामीण भागात स्त्रीयांनी याकडे लक्ष द्यावे. तसेच महिलाचे प्रसृतीपूर्व आणि प्रसृतीपश्चात उत्तम आरोग्य राहावे. गर्भधारणेसाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक आणि पोषणात्मक तयारीशिवाय गर्भधारणा राहू नये यासाठी असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बैठकीत दिली.

अभियान राबविण्यासाठी समिती गठीत
गर्भधारणेचा काळ फक्त नऊ महिन्यांचा प्रवास नसून तो गर्भधारणेपूर्वीच सुरू होतो. गर्भधारणेपूर्वीचा कालावधी हा मातेचे आरोग्य अनुकूल करण्यासाठी आणि गर्भधारणेच्या प्रतिकूल परिणामांचा धोका कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हे अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात यावी. या समितीत शासकीय सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि अशासकीय सदस्य म्हणून फॉग्सी आणि आयव्हीएमएमचे सदस्य घेण्यात येईल. तसेच गर्भधारणेच्या वेळी प्रत्येक महिलांच्या आरोग्याची तपासणी नियमित झाली पाहिजे. यासाठी गर्भवती महिलाच्या सदृढ आरोग्यासाठी फॉग्सी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘आयव्हीएचएम’ यांच्यासोबत प्रायोगिक तत्त्वावर चंद्रपूर आणि कोल्हापूर मध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे.