महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक विक्रमी, 2024-25 या वर्षात किती हजार कोटीची गुंतवणूक? वाचा…

संपूर्ण वर्षांत मिळून महाराष्ट्राने 1,64,875 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. यावर्षी देशात आलेली गुंतवणूक ही 4,21,929 कोटी रुपये इतकी आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करत सोशल मीडियावरुन दिली आहे.

State Government – राज्य सरकारच्या परदेशी गुंतवणुकीबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. 2024-25 या वर्षात महाराष्ट्र राज्यात देशाच्या 40 टक्के इतकी परकीय गुंतवणूक झाली आहे. तसेच राज्यात गेल्यावर्षीपेक्षा 32 टक्के इतकी अधिक परकीय गुंतवणूक झाली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची (जानेवारी ते मार्च 2025) आकडेवारी सुद्धा आता जाहीर झाली असून,

आता या संपूर्ण वर्षांत मिळून महाराष्ट्राने 1,64,875 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. यावर्षी देशात आलेली गुंतवणूक ही 4,21,929 कोटी रुपये इतकी आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करत सोशल मीडियावरुन दिली आहे.

32 टक्के गुंतवणूक अधिक…

दरम्यान, या शेवटच्या तिमाहीत 25,441 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हे वर्ष गेल्या 10 वर्षांतील रेकॉर्ड स्थापित करणारे वर्ष ठरले. अर्थात हा रेकॉर्ड आपण पहिल्या 9 महिन्यातच मोडला होता. मी महाराष्ट्रातील जनतेचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. तसेच महाराष्ट्रात गेल्यावर्षीचा विचार केला तर यावर्षी त्यापेक्षा 32 टक्के गुंतवणूक अधिक आली आहे. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड ही अशीच कायम राहील. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्ह्टले आहे.

गेल्या 10 वर्षांत आकडेवारी काय सांगते?

– 2015-16 : 61,482 कोटी
– 2016-17 : 1,31,980 कोटी
– 2017-18 : 86,244 कोटी
– 2018-19 : 57,139 कोटी
– एप्रिल ते ऑक्टोबर 2019 : 25,316 कोटी
– 2020-21 : 1,19,734 कोटी
– 2021-22 : 1,14,964 कोटी
– 2022-23 : 1,18,422 कोटी
– 2023-24 : 1,25,101 कोटी
– 2024-25 : 1,64,875 कोटी


About Author

Astha Sutar

Other Latest News