उद्यापासून या जुन्या iPhone आणि Android वर WhatsApp चालणार नाही! संपूर्ण यादी पाहा

हा बदल Meta कंपनीच्या नियमित अपडेट्सचा एक भाग आहे. WhatsApp आता अ‍ॅप वापरण्यासाठी किमान सॉफ्टवेअर व्हर्जनची अट वाढवत आहे.

Whatsapp : जर तुम्ही जुना स्मार्टफोन वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, WhatsApp १ जून २०२५ पासून काही जुने iPhone आणि Android डिव्हाइसेसवर काम करणे थांबवणार आहे. सुरुवातीला हा बदल मे महिन्यात लागू होणार होता, परंतु काही काळाची मुदत दिल्यानंतर कंपनीने आता जूनपासून हे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या फोनवर WhatsApp बंद का होणार आहे?

हा बदल Meta कंपनीच्या नियमित अपडेट्सचा एक भाग आहे. WhatsApp आता अ‍ॅप वापरण्यासाठी किमान सॉफ्टवेअर व्हर्जनची अट वाढवत आहे. यामागचा उद्देश म्हणजे युजर्सना अधिक चांगली सुरक्षा व नवीन फिचर्स देणे. यापुढे iOS 15 किंवा त्यापेक्षा जुन्या व्हर्जनवर चालणारे iPhone आणि Android 5.0 किंवा त्यापेक्षा जुन्या व्हर्जनवरील Android डिव्हाइसेसवर WhatsApp काम करणार नाही.

कोणते फोन होतील प्रभावित?

iPhone मॉडेल्स:

  • iPhone 5s
  • iPhone 6
  • iPhone 6 Plus
  • iPhone 6s
  • iPhone 6s Plus
  • iPhone SE (पहिली पिढी)

Android फोन:

  • Samsung Galaxy S4
  • Samsung Galaxy Note 3
  • Sony Xperia Z1
  • LG G2
  • Huawei Ascend P6
  • Moto G (1st Gen)
  • Motorola Razr HD
  • Moto E 2014

हे सर्व डिव्हाइसेस आता खूप जुने झाले आहेत आणि यांना नवीन अपडेट्स मिळत नाहीत, त्यामुळे WhatsApp चे नवीन सिक्योरिटी फीचर्स आणि सुविधा या डिव्हाइसेसवर कार्यान्वित होणार नाहीत.

तुमचा फोन प्रभावित आहे की नाही, कसे ओळखावे?

जर तुमचा फोन iOS 15.1 किंवा Android 5.1 किंवा त्याहून नवीन व्हर्जनवर चालत असेल, तर काळजी करण्याचे कारण नाही. मात्र वर दिलेल्या लिस्टमध्ये तुमचा फोन आहे किंवा जुन्या सॉफ्टवेअरवर चालत असेल, तर लवकरात लवकर नवीन फोन घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

बॅकअप घेणे आवश्यक का?

WhatsApp ने सुचवले आहे की, जर तुम्ही जुना फोन वापरत असाल आणि नवीन घेण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम तुमच्या चॅट्सचा बॅकअप घ्या. यासाठी WhatsApp उघडा, Settings > Chats > Chat Backup वर जा आणि Google Account वापरून बॅकअप घ्या. यामुळे तुमच्या सर्व चॅट्स एका क्लिकमध्ये नवीन फोनमध्ये ट्रान्सफर होतील.

सुरक्षेचा विषय महत्त्वाचा

Meta च्या मते, या निर्णयामागे प्रमुख कारण म्हणजे सुरक्षा. जुने डिव्हाइसेस सॉफ्टवेअर अपडेट्स मिळत नसल्यामुळे त्यांना हॅकिंग व डेटा चोरीचा धोका अधिक असतो. त्यामुळे WhatsApp युजर्सनी नवीन आणि सुरक्षित डिव्हाइसेसकडे वळावे अशी कंपनीची इच्छा आहे.

अलीकडेच WhatsApp ने चॅट लॉक, कंटेंट कॉपी ब्लॉकिंग, आणि ऑटो-डिलीट मेसेजेस यांसारखे अनेक नवीन फीचर्स सादर केले आहेत, जे केवळ नवीन OS आणि लेटेस्ट डिव्हाइसेसवरच सुरळीत चालतात.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News