मुंबई – सध्या उन्हाचा कडाका आहे. सर्वांचीच अंगाची लाही-लाही होत आहे. वातावरणातील तापमानाचा पारा कमालीचा वाढल्यामुळे सर्वत्र गर्मी आणि उकाडा जाणवत आहे. या उकाड्याच पाण्याचा तुटवडा सुद्धा जाणवत आहे. परंतु या उन्हाळ्यात महाराष्ट्रातील चंद्रपूर शहर हे जगातील सर्वाधिक तापमानाचे शहर किंवा सर्वाधिक उष्ण तापमानाचे शहर ठरले आहे.
चंद्रपुरात तापमानाचा पारा किती?
दरम्यान, चंद्रपूरकर सध्या वाढत्या तापमानामुळं हैराण झाले आहेत. तसेच चंद्रपूरमध्ये दिवसभरात अघोषित संचारबंदी लागू केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण इथे मोठ्या प्रमाणात तापमानातील पारा वाढला असून, कडाक्याचे ऊन आहे. त्यामुळे सकाळी ११-१२ ते दोन दुपारी २-३ वाजेपर्यंत घरातून कोणीही बाहेर पडत नाही. परिणामी येथे एक प्रकारची अघोषित संचारबंदी लागू केल्याचं चित्र दिसत आहे. रस्त्यावरती दुपारी शुकशुकाट असतो. कारण प्रचंड कडाक्याची ऊन… त्यामुळे उष्माघात वाढला आहे. या उष्माघाताचा त्रास लोकांना जाणवत आहे. चंद्रपुरात ४५.६ अंश सेल्सिअस एवढे तापमान पोचले आहे. त्यामुळे जगातील सर्वात उष्ण शहराच्या यादीत चंद्रपूर आघाडीवर आहे.

सर्वाधिक उष्ण शहरे कोणती?
जगभरातील सर्वात उष्ण १५ शहरांमध्ये ११ शहरे एकट्या भारतातील आहेत. यात विदर्भातील ४ शहरांचा समावेश आहे. दरम्यान, आगामी काळात मराठवाड्यासह विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामानतज्ज्ञांनी दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी तापमानाचा पारा ४२ किंवा त्यापेक्षा अधिक राहिल, असं हवामानतज्ज्ञांनी म्हटले आहे.
- चंद्रपूर – ४५.६ अंश सेल्सिअस
- झारसुगुडा येथे ४५.४ अंश तापमान
- सिधी (४४.६), सातवे
- राजनांदगाव (४४.५),
- प्रयागराज व धूपुर (४४.३)
- खजुराहो (४४.२),
- आदिलाबाद (४३.८)
- रायपूर (४३.७)