बिहार: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आक्रमक पवित्र्यात पाहायला मिळत आहेत. आता बिहारमधून दहशतवाद्यांना पंतप्रधान मोदींनी सज्जड दम दिला आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांना हा सज्जड दम असल्यचाचं बोललं जात आहे.
काय म्हटले पंतप्रधान?
“दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांची उरलीसुरली भूमी संपवण्याची हीच वेळ आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. तसेच पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा भारताच्या सार्वभौमत्वावरील हल्ला आहे.” अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली आहे.

मोदींच्या या इशाऱ्यानंतर आता भारतासह जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यानिमित्ताने मोदींनी दहशतवादाविरोधात अवघ्या जगाने एकत्रित यावं असं आवाहन केलं आहे.
‘दहशतवादाविरोधात एकत्रित लढू..’
दहशतवादाविरोधात आपला भारत नेहमीच एकसंघ उभा राहतो, आता अवघ्या विश्वाने दहशतवाद संपवण्यासाठी हालचाली करण्याची गरज आहे, असं मोदींनी म्हटलं आहे. बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्याहस्ते गॅस, ऊर्जा, रेल्वे विभागातील विविध 13,483 कोटींच्या विकासकामांची घोषणा आणि काही कामांचे लोकार्पण मोदींच्याहस्ते करण्यात आले. यावेळी, बोलताना पहलगाम हल्ल्यातील घटनेवर मोदींनी दु:ख व्यक्त केलं.
“अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है”
“अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है”
पीएम मोदी बोले “यह देश की आत्मा पर हमला करने का दुस्साहस”@narendramodi @BJP4India @AmitShah @JPNadda @vdsharmabjp #PahalgamTerroristAttack #pahalgamattack #PahalgamTerrorAttack #पहलगाम #bihar… pic.twitter.com/E6ddcJF1cW
— MP Breaking News (@mpbreakingnews) April 24, 2025