“येताय ना? म्हणजे काय यायलाच लागतंय…”, मोर्चात सहभागी होण्यासाठी बाळा नांदगावकर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

मोर्चात सहभागी होऊन सरकारचा निषेध करावा, यासाठी मनसे व ठाकरे गटाकडून आवाहन करण्यात येत आहे. आता मनसे नेत बाळा नांदगावकरांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

Bala Nandgaonkar – राज्यात तिसरी भाषा सक्तीची यावरून विरोधकांनी मोठा विरोध केला आहे. सध्या राज्यात तिसरी भाषा आणि हिंदी सक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हिंदी आणि सरकारच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पाच जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात तमाम मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी, सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी मोर्चात सहभागी होऊन सरकारचा निषेध करावा, यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून आवाहन करण्यात येत आहे. यावर आता मनसे नेत बाळा नांदगावकरांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

मराठीवरील प्रेम मोर्चातून…

दरम्यान, ५ जुलै रोजी मुंबईकरांनी मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसे नेत बाळा नांदगावकरांनी फेसबुक पोस्ट  करत मुंबईकरांना आवाहन केलं आहे. “५ जुलै रोजी शाळेतील सक्तीच्या हिंदी विरोधात पक्षविरहित सर्व मराठी बांधवांचा मोर्चा आयोजित केला आहे. कोणत्याही राजकीय मागणीसाठी नव्हे, तसेच कोणत्याही भाषेचा द्वेष म्हणून नव्हे तर आपल्या मायबोली मराठीवरील प्रेम या मोर्चातून व्यक्त करण्यासाठी माझी सर्वांना विनम्र विनंती आहे की तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने सहपरिवाराने उपस्थिती नोंदवावी”.

ठाकरेंच्या” व “मराठी माणसांच्या…

“एकीचे बळ या म्हणीप्रमाणे आपल्या भाषेसाठी तरी सर्व काही बाजूला ठेवून एकत्र येऊन लढा द्यायची हीच ती वेळ. आपली मराठी ही आपली खास ओळख आहे आणि मराठीच आपली कायमस्वरूपी ओळख रहावी यासाठी हा मोर्चा. “ठाकरेंच्या” व “मराठी माणसांच्या” निर्धाराने निघणाऱ्या या “सर्वपक्षीय” तरीही “पक्षविरहित” मोर्चाला आपली भेट होईलच. जय महाराष्ट्र” असं फेसबुक पोस्टमध्ये मनसे नेत बाळा नांदगावकरांनी म्हटलं आहे. तसेच पोस्टमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो सुद्धा दिसत आहे.

About Author

Astha Sutar

Other Latest News