Sunday Railway Mega Block – मुबईच्या रेल्वे लोकलबाबत एक महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील रेल्वे लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो मुंबईकर या रेल्वे लोकलमधून प्रवास करतात. दरम्यान, रविवारी (दिनांक 29.06.2025) रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रविवारी रेल्वेचे वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडा, अन्यथा तुम्ही अडकून पडण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?
दरम्यान, मध्य रेल्वेवर सकाळी १० ते ३.४० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३४ ते दुपारी ३.०३ पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद/अर्धजलद उपनगरी सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

दुसरीकडे कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील आणि दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त १० मिनिटे उशिरा पोहोचतील.
हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?
दुसरीकडे हार्बर रेल्वेवर सुद्धा सकाळी १०.३३ ते दुपारी ४.४९ पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाईन वगळून) अप आणि डाउन हार्बर लाईनवर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. पनवेल येथून १०.३३ ते दुपारी ४.४९ पर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ९.४५ ते दुपारी ४.१२ पर्यंत बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर लाईन सेवा रद्द राहतील.
ट्रान्स हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?
पनवेल येथून ११.०२ ते दुपारी ४.५३ पर्यंत सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर लाईन सेवा आणि
ठाणे येथून १०.०१ ते दुपारी ४.२० पर्यंत सुटणाऱ्या पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर लाईन सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी विभागात विशेष लोकल चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्टेशन दरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध राहतील.