Aditya Thackeray-Nilesh Rane – आज विधानसभेत आदित्य ठाकरे यांनी सरकारमधील नेत्यांवर चड्डी-बनियान गँगवरून बोचरी टीका केली. मात्र त्यांनी ही टिका कोणाला उद्देशून केली? हे स्पष्ट करावे… असा आक्रमक पवित्रा निलेश राणेंनी घेतला. त्यामुळे चड्डी-बनियान गँगवरून विधानसभेतील सभागृह आदित्य ठाकरे आणि निलेश राणे आमनेसामने आले. आणि गदारोळ झाल्याचे पाहयला मिळाले.
सरकारने मुंबईकरांना दिलासा द्यावा…
विधानसभेतील सभागृहात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरे सरकारमध्ये आम्ही 500 स्क्वेअर फुटपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स माफ केला होता. बसचे भाडे मर्यादित ठेवले होते. त्यामुळे आत्ताचे सरकारने मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी 750 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांचा प्रॉपर्टी टॅक्स माफ केला पाहिजे… तसेच जी बस भाडेवाढ झाली आहे, ती भाडेवाढ रद्द केली पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

चड्डी-बनियन गॅंगवर मुख्यमंत्री काय कारवाई करणार?
दरम्यान, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रती माझी सहानुभूती आहे. कारण ते चड्डी-बनियान गॅंगसोबत बसले आहेत. मग हे सरकारमधील चड्डी-बनियनवाले कुठे जाऊन कोणाला बुक्का मारताहेत तर आणखी काय करताहेत. परंतु त्यांच्यावर काही कारवाई होत नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांनी खूप सहनशिलता दाखवली आहे. पण सरकार काय असते… शासन काय असते… हे दाखवण्याची वेळ आली आहे. त्या चड्डी-बनियनवर कारवाई करण्याची वेळ आली आहे. आणि ही कारवाई मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.
हिंम्मत असेल तर नाव घ्या…
सन्माननीय सदस्यांनी जे चड्डी-बनियान हे शब्द वापरलेत ते नेमकी चड्डी कोण? आणि नेमकी कोणाची बनियान? आहे हे कोणासाठी वापरले आहेत. हे एकदा सन्माननीय सदस्यांनी स्पष्ट करावे. जर त्यांना बोलण्याची भीती वाटत असेल तर सभागृहात असे शब्द वापरू नका. हिंम्मत असेल तर त्यांनी कोणावर कारवाई झाली पाहिजे, याचे नाव सांगावे… हे शब्द कोणासाठी होते आणि कोणासाठी वापरले, हे हिम्मत असेल तर त्यांचे नाव घ्यावे. असं आदित्य ठाकरेंच्या चड्डी-बनियान टिकेला आमदार निलेश राणेंनीही जशास तसे प्रतिउत्तर दिले आहे.
अन्यथा रेकॉर्डमधून काढून टाका…
एक तासापासून आम्ही काही बोलत नाही. उगाच काही बोलायचे आणि टिका करायची म्हणून करायची का? एकतर सदस्यांनी हे कोणाबद्दल शब्द होते हे स्पष्ट करावे अन्यथा हे शब्द रेकॉर्डमधून काढून टाका, अशी आक्रमकपणे मागणी आमदार निलेश राणेंनी केली. दरम्यान, यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांकडून गदारोळ पाहायला मिळाला.